बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. शाहरुख खान लवकरच ‘पठाण’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय तो सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे. मुंबई विमानतळावर सेल्फी घेणाऱ्या एका चाहत्याने शाहरुखसोबत असं काही वर्तन केलं ती किंग खान त्याच्यावर चिडलेला पाहायला मिळाला. शाहरुख खानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे.

प्रसिद्ध फोटो जर्नलिस्ट विरल भयानी यांनी शाहरुख खानचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये शाहरुख खानसोबत त्याची मुलं आर्यन खान आणि अबराम खानही दिसत आहेत. शाहरुख खानने विमानतळावरून बाहेर पडताना अबरामचा हात पकडल्याचे व्हिडिओत दिसत आहे. आर्यन त्यांच्यासोबत चालताना दिसत आहे. अशात शाहरुखचा एक चाहता अचानक येतो आणि शाहरुखचा हात खेचून त्याच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतो पण शाहरुख मागे होतो. हे सर्व पाहून अबरामही घाबरल्याचं दिसत आहे. त्यामुळे शाहरुख त्या व्यक्तीवर काहीसा चिडलेला दिसत आहे.

आणखी वाचा- KBC 14: ५० लाखांच्या ‘या’ प्रश्नासाठी आमिरने वापरली लाइफ लाइन, तुम्हाला माहितीये का अचूक उत्तर?

शाहरुख खानच्या या व्हायरल व्हिडिओवर नेटकरी कमेंट करून त्याला पाठिंबा देताना दिसत आहेत. तसेच आर्यन खानचं कौतुक करताना दिसत आहेत. एका युजरनं लिहिलं, “तो माणूस शाहरुखजवळ आला तेव्हा अबराम घाबरला. हे खरंच वाईट आहे.” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “आर्यननं माझं मन जिंकलं, त्याने फक्त शाहरुखला सांभाळलं.” आणखी एका युजरने लिहिलं, “लोकांना पर्सनल लाइफचा अर्थ कधी समजेल, असं काही करून तुम्ही त्यांना भडकवता आणि जेव्हा ते त्यावर प्रतिक्रिया देतात तेव्हा ते तुम्हाला अपमानास्पद वाटतं.. एक चाहता म्हणून आपण देखील आपल्या मर्यादा समजल्या पाहिजेत.”

आणखी वाचा- तू किंग खान नाहीस म्हणणाऱ्यांना अभिनेता विजय वर्माने दिले सडेतोड उत्तर, म्हणाला, “आता शाहरुखनेच..”

शाहरुख खान कामाबद्दल बोलायचं तर सध्या तो ‘डंकी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्याने तापसी पन्नूसोबत या चित्रपटाचे एक शेड्यूल पूर्ण केले आहे आणि तो भारतात परतला आहे. दरम्यानच्या काळात चित्रपटाच्या सेटवरून अनेक फोटो आणि व्हिडिओही लीक झाले होते. राजकुमार हिरानी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. याशिवाय शाहरुख खान ‘पठाण’ आणि ‘जवान’ या चित्रपटांमध्येही दिसणार आहे.

Story img Loader