बाराव्या मरकिश आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मोरक्कोच्या राजकुमाराकडून बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याला पदक देऊन सन्मानीत करण्यात आले.
या महोत्सवातील पदकाबरोबरचे छायाचित्र शाहरुखने आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केले आहे. एवढेच नव्हे तर या सन्मानासाठी त्याने राजकुमाराचे धन्यवाद मानले असून महोत्सवाला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचप्रमाणे त्याने मोरक्कोच्या जनतेच्या प्रेमासाठी धन्यवाद दिले असून मोरक्कोच्या राजाचे आणि राजकुमाराचे आभार मानले आहेत.
मोराक्कोमधील या महोत्सवाला ३० नोव्हेंबरपासून सुरूवात झाली होती. सदर समारोह भारतीय चित्रपट सृष्टीला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अमिताभ बच्चन, ऋतिक रोशन, श्रीदेवी, शर्मिला टॅगोर आणि तब्बू असे अनेक बॉलिवूडचे कलाकार उपस्थित होते.
याआधी अमिताभ बच्चन यांना देखील हा सन्मान मिळाला आहे. अमिताभ बच्चन सतत दोन वर्षे या समारोहाला उपस्थित राहात आहेत. या आधी ते २००३ मध्ये येथे आले होते.

Story img Loader