बॉलीवूडचा बादशाह किंग खान शाहरूख सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय बनला आहे. शाहरूखला स्विझर्लंडमध्ये आयोजित एका फिल्म फेस्टिवलसाठी आमंत्रित करण्यात आले होते. तिथे ७७ वे लोकार्नो फिल्म फेस्टिवल आयोजित करण्यात आले होते. या फेस्टिवलमध्ये बॉलीवूडचा बादशाह शाहरूख खानला जीवनगौरव पुरस्काराने (Pardo alla Carriera- Lifetime Achivement) सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी शाहरूखने खास भाषण केले, त्याच्या या उत्कृष्ट भाषणाने चाहत्यांची मने जिंकली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या भाषणात शाहरूखने मस्करीत म्हटलं की, “ज्यांना मी माहीत नाही, मला ओळखत नसाल तर येथून जाऊ शकतात तसेच गुगल करून माझ्याबद्दल जाणून घेऊन मग परत येऊ शकतात.” त्याच्या या वक्तव्यानंतर स्विझर्लंडमधील त्याच्या चाहत्यांनी हसून दाद दिली. त्यानंतर शाहरूख खानने स्वतःची ओळख सांगितली. शाहरूख पुढे म्हणाला, “मी शाहरूख खान, मी भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये, मुख्यतः हिंदी चित्रपटांमध्ये काम करतो.”

गुगलची प्रतिक्रिया

दरम्यान, शाहरूखच्या “मला गुगल करा आणि मग परत या”, या वक्तव्यावर आता गुगलकडून प्रतिक्रिया आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर गुगलच्या अधिकृत हँडलवरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये शाहरूख खानच्या छायाचित्रासह “मला गुगल करा” असं कॅप्शन देण्यात आलं आहे. एवढंच नाही तर ही पोस्ट गुगलने शाहरूखला टॅगदेखील केली आहे. गुगलने क्राऊन या इमोजीसह किंग खान शाहरूखच्या नावाचा उल्लेख केला आहे.

लोकार्नो फिल्म फेस्टिव्हल कधी सुरु झाला?

चित्रपट जगतात सर्वाधिक काळापासून सुरु असलेल्या अनेक फिल्म फेस्टिव्हल्सपैकी एक असलेल्या लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलची सुरुवात १९४६ साली झाली. लोकार्नो फिल्म फेस्टिव्हल हा ऑस्करच्या बरोबरीचा महत्त्वाचा फिल्म फेस्टिव्हल आहे. यंदाच्या ७७ व्या लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये जगभरातून निवडक २२५ चित्रपट दाखवण्यात येणार असून, त्यापैकी १०४ चित्रपटांचे पहिल्यांदाच जागतिक स्तरावर प्रीमियर शो होत आहेत. तर १५ चित्रपटांचे पहिलेच शो होणार आहेत.

आगामी चित्रपट

दरम्यान अभिनेता शाहरूख खान ‘किंग’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट दिग्दर्शक सुजोय घोष हे दिग्दर्शित करणार आहेत. यावर लोकार्नो फिल्म फेस्टिवलमध्ये शाहरूखने स्वतः मोहर लावली आहे. तो म्हणाला, “मागील वर्षी मी ‘जवान’ आणि ‘डंकी’ चित्रपट पूर्ण केले, आता मला वेगळ्या प्रकारचा चित्रपट करायचा आहे. सुजोय आणि मी ७ वर्षांपासून काहीतरी वेगळं शोधण्याच्या प्रयत्नात होतो. आनंदाची गोष्ट म्हणजे आम्हाला असा विषय मिळाला आहे. तो आम्ही आता लवकरच प्रेक्षकांपुढे घेऊन येणार आहोत.”