बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान हा लोकप्रिय अभिनेत्यापैकी एक आहे. शाहरुखचे लाखो चाहते आहेत. शाहरुखचे चाहते ‘पठाण’ या त्याच्या आगामी चित्रपटाची प्रतिक्षा करत आहेत. शाहरुखने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चित्रपटाची घोषणा केली. दरम्यान, ४ वर्षांनंतर शाहरुख मोठ्या पडद्यावर परत येत आहे. नुकताच, शाहरुखचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.
शाहरुखचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. या व्हिडीओत शाहरुख मुंबई विमानताळवर असल्याचे दिसत आहे. पण डिपार्चर आधी शाहरुख त्याच्या ड्रायव्हरला मिठी मारतो.
आणखी वाचा : “पहिल्यांदा किस करताना मला…”, गिरिजा ओकने सांगितला कॉलेजमधला ‘तो’ विचित्र अनुभव
शाहरुखचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. एक नेटकरी म्हणाला, “त्याच्यात किती विनम्रता आहे बघा.” दुसरा नेटकरी म्हणाला, “त्याने ज्या प्रकारे ड्रायव्हरला मिठी मारली ते कौतुकास्पद आहे.” तिसरा नेटकरी म्हणाला, “विनम्रता बघा”, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी शाहरुखचे कौतुक केले आहे.
आणखी वाचा : शिल्पा शेट्टीने भर स्टेजवर रोहित शेट्टीला मारली लाथ, Video Viral
यश राज फिल्मला लवकरच ५० वर्षे पूर्ण होणार आहेत. यानिमित्ताने यश राज फिल्म्स ‘पठाण’ हा चित्रपटाची निर्मिती करत आहे. या चित्रपटात शाहरुख खान हा प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. ‘पठाण’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमही दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने शाहरुख आणि जॉन ही जोडी पहिल्यांदा पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
आणखी वाचा : टप्पूसोबत बाल विवाह करणारी टिना, पाहा आता कशी दिसते
शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषेत प्रदर्शित होणार आहे. येत्या २५ जानेवारी २०२३ रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.