अभिनेता शाहरूख खान सध्या त्याच्या तिसऱया अपत्याच्या जन्मपूर्व लिंग परीक्षणाच्या बातमीमुळे वादाच्या भोव-यात सापडला आहे. बाळाच्या जन्माआधीच त्याच्या लिंगनिदानाबाबत येत असलेल्या बातमी विषयी त्याच्या सहका-याशी संपर्क साधला असता, त्याने काहीही सांगण्यास नकार दिला.
राज्य सरकारचा एक वरिष्ठ अधिकारी म्हणाला, एक स्वयंसेवी संस्था आणि इंडियन रेडिओलॉजिकल एन्ड इमेजिंग असोसिएशनद्वारा या घटनेची चौकशी करण्याची मागणी आल्यानंतर त्यांनी बृहन्मुंबई महापालिकेला सदर माहितीची चौकशी करण्यास सांगितले आहे. महापालिकेच्या अखत्यारीत येणा-या क्षेत्रांमध्ये जन्मपूर्व लिंग निदानाशी निगडीत पीसीपीएनडीटी कायद्याद्वारे कार्यवाहीचे आधिकार क्षेत्रिय पालिका आधिका-यांच्या अखत्यारित आहेत.
दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य विभागाचे डॉक्टर यासंदर्भातील माहिती घेण्यासाठी वांद्रे येथील शाहरूखच्या ‘मन्नत’ बंगल्यावर गेले असता, घरात कोणी नसल्याने त्यांना परतावे लागले. आमचे अधिकारी त्याच्या घरी गेले होते. शाहरूखने सरोगसीद्वारे मुलाच्या जन्माचे कोणतेही विधान न केल्याचे त्याच्या व्यवस्थापकाने त्यांना सांगितल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. अरूण बामणे यांनी सांगितले.
माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार ४७ वर्षीय शाहरूख आणि त्याची पत्नी गौरी सरोगसीद्वारे त्यांच्या परिवारात नव्या छोट्या पाहुण्याच्या आगमनाची वाट बघत आहेत. शाहरूख आणि गौरीला आर्यन नावाचा मुलगा आणि सुहाना नावाची मुलगी आहे.
गर्भलिंग चाचणीवरून शाहरूख वादाच्या भोव-यात
अभिनेता शाहरूख खान सध्या त्याच्या तिसऱया अपत्याच्या जन्मपूर्व लिंग परीक्षणाच्या बातमीमुळे वादाच्या भोव-यात सापडला आहे. बाळाच्या जन्माआधीच त्याच्या लिंगनिदानाबाबत येत असलेल्या बातमी विषयी त्याच्या सहका-याशी संपर्क साधला असता, त्याने काहीही सांगण्यास नकार दिला.
आणखी वाचा
First published on: 18-06-2013 at 01:48 IST
TOPICSगौरी खानGauri KhanबॉलिवूडBollywoodशाहरुख खानShahrukh Khanहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 2 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahrukh khan in surrogacy controversy over sex determination test