हिंदी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार अभिनेता शाहरूख खान दोन दिवसांपूर्वी एका पंचतारांकित हॉटेलचा दरवाजा अंगावर पडल्यामुळे जखमी झाला होता. त्याच्यावर तत्काळ उपचार क रून त्याला रुग्णालयातून घरी जाऊ देण्यात आले होते. मात्र, त्याचवेळी शाहरूखच्या काही चाचण्याही करण्यात आल्या होत्या.
या चाचण्यांमधून शाहरूखच्या उजव्या खांद्याला फ्रॅक्चर झाल्याचे निष्पन्न झाले असून त्याला डॉक्टरांनी दोन ते तीन आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
फराह खान दिग्दर्शित ‘हॅप्पी न्यू इअर’ चित्रपटाचे चित्रिकरण करत असताना शाहरूखला दरवाजा अंगावर पडल्यामुळे मार लागला होता. त्याच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले होते. पण, त्याला आणखी कुठे मार लागला आहे का याची पडताळणी करण्यासाठी काही चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यातून त्याच्या उजव्या खांद्याला फ्रॅक्चर असल्याचे दिसून आले आहे.
शिवाय, त्याच्या गुडघ्यालाही दुखापत झाली असल्याने त्याला तीन आठवडे सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Story img Loader