बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. शाहरुख आधी त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटामुळे चर्चेत होता. तर आता शाहरुखने नुकतीच त्याचा आगामी चित्रपट ‘जवान’ची घोषणा केली होती. शाहरुखच्या या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
शाहरुखने जवानचा टीझर त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या टीझरमध्ये शाहरुखचा चित्रपटातला फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. चेहऱ्यावर पट्टी बांधून बंदुरीशी खेळणार शाहरुखचा लूक पाहून प्रेक्षकांना अनेक प्रश्न पडलेत की या चित्रपटाची पटकथा काय असेल?
आणखी वाचा : ‘रानबाजार’मुळे प्राजक्ता-तेजस्विनीला ट्रोल करणाऱ्यांना सचिन खेडेकरांनी दिलं उत्तर, म्हणाले “मराठी प्रेक्षक…”
आणखी वाचा : सोनाक्षी सिन्हाला रामायणावरील या सोप्या प्रश्नाचं उत्तर देता आले नाही, बिग बी म्हणाले…
हा चित्रपट २ जून २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडा भाषेत प्रदर्शित होणार आहे. दाक्षिण भारतात असलेल्या शाहरुखच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहेय
आणखी वाचा : कोणत्या मराठी अभिनेत्याने साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आवडली? सचिन खेडेकर म्हणाले…
शाहरुख खान सगळ्यात शेवटी ‘झिरो’ या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट आनंद एल राय यांनी दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिस यशस्वी होऊ शकला नाही. आता शाहरुख लवकरच सिद्धार्थ आनंद यांच्या ‘पठाण’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम दिसणार आहेत.