एकीकडे पुलेला गोपीचंद याच्यासारखे जागतिक पातळीवरील खेळाडू बॅडमिंटनमध्ये फारसे पैसे मिळत नसतानाही अगदी शीतपेयांची सुद्धा जाहिरात करण्यास, शीतपेये तरुणांच्या आरोग्यावर विपरित परिणाम करीत असल्याने नकार देतात. या पाश्र्वभूमीवर देशातील करोडो तरुण-तरुणींच्या हृदयात जाऊन बसलेला किंग खान मात्र पैशांसाठी (आणि प्रतिस्पध्र्यावर ‘चोरावर मोर’ करण्यासाठी) थेट पानमसाल्याची जाहिरात करतो आहे. जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत बॉलिवूडचा किंग खान दुसऱ्या क्रमांकावर आहे हे आत्ताच जाहीर झाले आहे. मात्र, शाहरूखच्या मानधनाचा आकडा दर चित्रपट आणि जाहिरातीमागे वाढतच चालला आहे. एका पानमसाला कंपनीचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून काम करण्यासाठी शाहरूखने चक्क २० कोटी रुपये मागितले आहेत. यातली एक गंमत अशी आहे की संबंधित पानमसाला कंपनीने आपल्याआधी सलमानला विचारणा केली होती, अशी कुणकु ण शाहरूखला लागली. त्यानंतर त्याने जाहिरातींसाठी २० कोटींपर्यंत आकडा वाढवल्याचे बोलले जाते. पान मसाल्याच्या जाहिरातीसाठी संबंधित कंपनीने पहिल्यांदाच वेगळ्या स्वरूपात, एक छोटी कथा घेऊन जाहिरात करायचे ठरवले होते. एको सामान्य घरातून आलेला मुलगा, बॉलिवूडमध्ये कोणाचीही ओळखपाळख नसताना सुपरस्टार पदापर्यंत पोहोचतो, असे या जाहिरातीत दाखवले जाणार आहे. या जाहिरातीसाठी क ोणत्यातरी ‘स्टार’पुत्राला घ्यायचे, असे त्यांनी ठरवले होते. पण, अशाप्रकारे स्वत:च्या बळावर सुपरस्टार बनणाऱ्यांमध्ये शाहरूखसारखे उत्तम नाव नाही, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी निर्णय बदलला. मात्र, शाहरूखकडे जाण्याआधी त्यांनी ‘बीइंग ह्युमन’ भाईलाही जाहिरातीसाठी विचारणा केली आणि तिथेच त्यांची चूक झाली.  शाहरूखला खरेतर पैशासाठी पानमसाल्याची जाहिरात करण्याची गरज नाही. मात्र, एवढा श्रीमंत माणूस असला तरी पैशासाठी शाहरूख काहीही करायला तयार असतो, असे त्याच्याबाबतीत म्हटले जाते. शाहरूखने अशा टीके कडे कधीही लक्ष दिले नाही. आत्ताही तो तेच करतो आहे. एवढय़ा मोठय़ा सुपरस्टारला पैशासाठी पानमसाल्याची जाहिरात करायला लागावी? पण, अमिताभ बच्चन जर डोक्यावर थापायच्या तेलापासून हार्पिकपर्यंत सगळ्याप्रकारच्या जाहिराती करत असतील तर शाहरूख कसा मागे राहील? भरीस भर म्हणून सलमानलाही जाहिरातीसाठी विचारले गेले होते म्हटल्यावर साहजिकच शाहरूखने त्यांना नकार देण्यापेक्षा मानधनाचा आकडाच मोठा करायचे ठरवले. त्याने जाहिरातीसाठी २० कोटी रुपये मागितले आहेत. अजूनही शाहरूख आणि त्यांच्यात बोलणी सुरू असून सदर कंपनीही शाहरूखसाठी तेवढे पैसे मोजायला तयार असल्याचे समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा