बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तो केवळ ३४ वर्षांचा होता. सुशांतने बॉलिवूडमधील घराणेशाहीला वैतागून आत्महत्या केली असं काही कलाकारांचं मत आहे. दरम्यान सुशांतचा एका पुरस्कार सोहळ्यामधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख खान आणि शाहिद कपूर सुशांतची खिल्ली उडवताना दिसत आहेत. या व्हिडीओमुळे प्रसिद्ध गायीका मालिनी अवस्थी सांतापल्या आहेत. त्यांनी ट्विट करुन आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचे ट्विट पाहून नेटकऱ्यांनी शाहिद आणि शाहरुखला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“हा व्हिडीओ पाहून मला धक्काच बसला आहे. करमणुकीच्या नावाखाली हा विचित्र प्रकार सुरु आहे. इतर कलाकारांना हसवण्यासाठी सुशांतचा असा अपमान करणं योग्य नव्हतं.” अशा आशयाचे ट्विट करुन मालिनी अवस्थी यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हे ट्विट पाहून अनेकांनी शाहरुख आणि शाहिदवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी या अभिनेत्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

सुशांतचा थक्क करणारा प्रवास

सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. २००९ मध्ये ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तो घरघरांत पोहोचला. त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahrukh khan shahid kapoor sushant singh rajput mppg