बॉलिवूडचा किंग खान अभिनेता शाहरुख खान आणि दिग्दर्शक फराह खान हे खूप चांगले मित्र आहेत. फराहने शाहरुखच्या अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. मात्र, काही वर्षांपूर्वी शाहरुखने फराहचा पती शिरीष कुंदरच्या कानशिलात लगावली होती.

शिरीष कुंदर हा बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शकांपैकी एक आहे. शिरीषने २०१२ मध्ये एक ट्वीट केलं होतं. ट्वीट करत शिरीषने ‘रा.वन’ या चित्रपटावरून शाहरुखला टोला लगावला होता. हा चित्रपट बिग बजेट चित्रपट होता. या चित्रपटाचा बजेट हा १५० कोटींचा होता. “मी आता ऐकल की १५० कोटींचा फटाका फुसका निघाला”, असे ट्वीट शिरीषने केले होते.

२०१२ मध्ये संजय दत्तचा ‘अग्निपथ’ हा चित्रपट हिट झाल्यानंतर संजय दत्तने मुंबईतील एका क्लबमध्ये पार्टीचे आयोजन केले होते. त्या पार्टीमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. तर शाहरुख आणि शिरीष या दोघांनी त्या पार्टीमध्ये हजेरी लावली होती. यावेळी शिरीष सतत शाहरुखला त्रास देत होता. त्यानंतर शाहरुखला राग आला आणि शाहरुखने शिरीषला कालशिलात लगावली. त्यावेळी त्यांचे भांडण थांबवण्यासाठी संजय दत्त मध्ये आला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

भांडणानंतर स्वत: फराह खानने एका मुलाखतीत या विषयावर वक्तव्य केलं होतं. “शिरीष, संजय दत्तच्या पार्टीत माझ्या पतीला शाहरुख खान आणि त्याच्या तिन्ही बॉडीगार्डने मारले. शाहरुखने शिरीषला विचारले की त्याने त्याच्याविरोधात ट्वीट का केले? आमच्या बाजूने कोणीही त्याला भडकवले नव्हते. शिरीषला ओरडतं तो म्हणाला की तो मला देखीस उद्धवस्त करेल, असे फराह म्हणाली.

आणखी वाचा : नाइट क्लबमध्ये पार्टीसाठी गेलेल्या प्रियांकाच्या मागे लागली लेस्बियन आणि…

एवढं असूनही शिरीषने शाहरुख विरोधात पोलिसात तक्रार केली नाही. एवढंच नाही तर त्याने सांगितलं की शाहरुख आणि त्याच्यात भांडण झालचं नाही.

Story img Loader