Shahrukh Khan Son Alcohol Brand: शाहरुख खानचा लेक आर्यन खान यापूर्वी ड्रग्ज प्रकरणाने बराच चर्चेत आला होता. आता कुठे या प्रकरणाला पूर्णविराम मिळत असताना आर्यन खान आपला स्वतःचा वोडका ब्रँड लाँच करणार असल्याचे समजत आहे. आपल्या दोन पार्टनर्ससह आर्यन खान हा नवीन व्होडका ब्रँड बाजारात आणणार आहे. जगातील सर्वात मोठी बिअर उत्पादक कंपनी AB InBev सह भागीदारीमध्ये आर्यन नवीन व्यवसायात पदार्पण करणार आहे. ही कंपनी भारतात बडवाईजर, कोरोना सारख्या बिहारचे उत्पादन करते.

दारूच्या ब्रँडचा मालक असणारा शाहरुखचा लेक आर्यन हा एकटाच नाही. बॉलिवूड व मनोरंजन क्षेत्रात असे अनेक मोठे कलाकार आहेत ज्यांनी अल्कोहोल व्यवसायात पार्टनरशिप घेतली आहे. हे कलाकार कोणते व त्यांनी दारूच्या कोणत्या ब्रँडमध्ये गुंतवणूक केली आहे हे जाणून घेउयात..

sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Family recreate iconic Hum Aapke Hain Koun scene
‘गाने बैठे गाना, सामने…’ कुटुंबातील सदस्यांनी ‘हम आपके है कौन’मधील ‘ते’ गाणं केलं रिक्रिएट; VIRAL VIDEO पाहून वाजवाल टाळ्या
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य
in pune Karvenagar area drunk gang attacked youth due petty dispute
कर्वेनगरमध्ये मद्यपींकडून तरुणावर हल्ला, तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गु्न्हा
liquor ban Nandurbar loksatta
नंदुरबार जिल्ह्यातील गावात दारुबंदीसाठी मतपत्रिकेवर बाटली झाली आडवी

डॅनी डेन्जोंगपा (Danny Denzongpa)

बॉलिवूड मध्ये बॅड बॉय अशी प्रतिमा असणारा डॅनी डेन्जोंगपासुद्धा प्रसिद्ध अल्कोहोल ब्रँडचा मालक आहे. आसाम मध्ये तयार होणारी राइनो ब्रूवरीज ही डॅनीच्या मालकीची आहे. इतकंच नव्हे तर डॅनीच्या नावावरून डान्सबर्ग हा प्रसिद्ध बिअर ब्रँड सुद्धा प्रसिद्ध आहे. सिक्कीममधील हा सर्वाधीक विक्री होणारा ब्रँड म्हणून ओळखला जातो.

निक जोनस (Nick Jonas)

प्रियांका चोप्राचा नवरा निक जोनसने सुद्धादारूच्या व्यवसायात गुंतवणूक केली आहे. निक जोनसने अमेरिकन डिझाइनर जॉन वारवातोससह २०१८ मध्ये आपला Tequila ब्रँड Herbaceous and Earthy लाँच केला होता. हा ब्रँड तीन प्रकारचे Tequila बनवत असून आपल्या भन्नाट पॅकेजिंगसाठी प्रसिद्ध आहे.

जॉर्ज क्लूनी (George Clooney)

हॉलिवूडचा प्रसिद्ध व जगातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता अशी ओळख असणारा जॉर्ज क्लुनी याने २०१३ मध्ये Casamigos Tequila लाँच केला होता. सुरुवातीला हा ब्रँड क्लुनीने वैयक्तिक वापरासाठी तीन भागीदारांसह बनवला होता. २०१७ मध्ये डिएगो हा कंपनीने हा ब्रँड खरेदी केला होता.

केट ह्यूडसन (Kate Hudson)

हॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री केट ह्युड्सन हिने सुद्धा King St. Vodka मध्ये गुंतवणूक केली आहे. न्यूयॉर्कमधील किंग्स स्ट्रीटवरून या ब्रँडचे नाव ठेवण्यात आले आहे. केट ह्युडसनचा व्होडका ब्रँड हा ग्लुटेन फ्री व अल्कलाईन वॉटर वापरून तयार करण्यात आला आहे.

अँजेलिना जॉली व ब्रॅड पिट

हॉलिवूडचं पॉवर कपल अँजेलिना जॉली व ब्रॅड पिट यांनीही Miraval या दारूच्या ब्रँड मध्ये गुंतवणूक केली आहे. या कंपनीने जगात पहिल्यांदा रोज फ्लव्हेअर शॅम्पेन लाँच केली होती. या शॅम्पेनची किंमत ३९० डॉलर इतकी आहे.

दरम्यान, शाहरुखच्या लेकाने म्हणजेच आर्यन खानची नवी कंपनी व्होडका सह रम व व्हिस्की सुद्धा लाँच करणार आहे प्राप्त माहितीनुसार येत्या काळात आर्यन खान कपडे व अन्य ऍक्सेसरीजचे ब्रँड लाँच करण्याच्या सुद्धा तयारीत आहे.

Story img Loader