क्रुझवरील अमलीपदार्थांच्या पार्टीप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान जवळपास गेल्या १९ दिवसांपासून तुरुंगात आहे. त्याचा तुरुंगवास संपायची चिन्ह दिसत नाही. बुधवारी एनडीपीएसच्या विशेष न्यायालयानं आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे आर्यनच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. रिपोर्टनुसार, तुरुंगात वेळ घालवण्यासाठी आर्यनने पुस्तकांचा वापर करत असल्याचे म्हटले जात आहे.
नवभारत टाईम्सला मिळालेल्या रिपोर्टनुसार, आर्यनने तुरुंगातील लायब्ररीमधून दोन पुस्तक घेतली आहेत. तुरुंगातील अधिकाऱ्यांच्या मते, जामीन अर्ज फेटाळल्याची बातमी ऐकून आर्यन अस्वस्थ झाला होता. त्यामुळे त्याला पुस्तकं वाचण्याचा सल्ला देण्यात आला.
आणखी वाचा : “हिंदू धर्माच्या सणावेळीच ज्ञान का देता….” ; ‘त्या’ पोस्टमुळे रितेश देशमुख झाला ट्रोल
आणखी वाचा : जात लपवण्यासाठीच वडिलांनी स्वीकारलं ‘बच्चन’आडनाव, अमिताभ यांचा खुलासा
आर्यनला दोन पुस्तक देण्यात आली आहेत. ज्यात एक ‘Golden Lion’ आणि दुसरं राम आणि सीता यांच्या कहाणीवर आधारीत पुस्तक देण्यात आलं आहे. आर्यनचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर २१ ऑक्टोबरला शाहरुखखानने पहिल्यांदाच आर्थर रोड जेलमध्ये जाऊन मुलाची भेट घेतली आहे. ९ वाजता शाहरुख खान साध्या कारने आर्थर रोड तुरुंगाबाहेर पोहोचला. शाहरुख येणार असल्याची यावेळी कुणालाही कल्पना नव्हती.
आणखी वाचा : ‘या’ कारणामुळे शाहरुख आजही विसरला नाही चंकी पांडेचे ‘ते’ उपकार
आर्यन खानच्या व्हाटस्अप चॅटमधून मिळालेल्या माहितीच्या आधारावर त्याचा जामीन फेटाळण्यात आला आहे. आर्यन आणि अन्य दोन आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग सकृतदर्शनी गंभीर आहे. त्यामुळे जामिनावर असताना तो अशा प्रकारचा गुन्हा पुन्हा करणार नाही हे म्हणता येऊ शकत नाही, शिवाय एनसीबीने प्रकरणाशी संबंधित सादर केलेली कागदपत्रे आणि आर्यन, अरबाज यांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर स्वेच्छेने दिलेल्या जबाबानुसार त्यांनी सेवनासाठी अमलीपदार्थ बाळगल्याचे कबूल केले होते. यावरून अरबाजच्या बुटातून हस्तगत केलेल्या अमलीपदार्थाबाबत त्याला माहिती होती हेच स्पष्ट होते. या बाबी लक्षात घेता आरोपींना जामीन देता येणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले.