बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान बऱ्यात काळापासून पडद्यापासून लांब आहे. त्याचे चाहते बऱ्याच काळापासून शाहरुखच्या आगामी चित्रपटाची प्रतिक्षा करत आहेत. यात शाहरुखचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आहे. हा व्हिडीओ नसून एक जाहिरात आहे. शाहरुखने डिझ्नी प्लस हॉटस्टारसाठी ही जाहिरात केली आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या जाहिरातीला २० लाखांपेक्षा जास्ती लोकांनी पाहिले आहे. मात्र, यावेळी प्रेक्षकांचे लक्ष हे शाहरुखच्या स्टाईलने वेधले आहे.
शाहरुखने या जाहिरातीत डेनिम जॅकेट, टी-शर्ट, कार्गो पॅंट परिधान केली आहे. यासोबत शाहरुखने त्याचा लूक कॅज्युअल ठेवण्यासाठी स्नीकर्स घातले आहेत. या जाहिरातीत असलेला शाहरुखचा लूक हा ३३ लाख रूपयांच्या जवळपास आहे. शाहरुखने घातलेले नायकी एअर जॉर्डन १ हाय ओजी इलेक्ट्रो ऑरेंज या बुटांची किंमग ही ४९५ अमेरिकन डॉलर म्हणजेच ३६ हजार ३७४ रुपये एवढी आहे. तर शाहरुखने परिधान केलेल अमीरी एमएक्स २ स्टोनवॉश डेनिम जॅकेटची किंमत ही १ हजार २३९ अमेरिकन डॉलर म्हणजेच अंदाजे ९१ हजार ३०७ रुपये आहे. शाहरुखने परिधान केलेला झाडिग आणि व्होल्टेयर मोनास्टिर हेनलेच्या टी-शर्टची किंमत ही १४९ अमेरिकन डॉलर म्हणजेच ११ हजार ६८३ रुपये आहे. त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाहरुखच्या हातात असलेली घड्याळ आहे. त्या घड्याळाची किंमत ही ४३ हजार ७७० डॉलर म्हणजे ३२ लाख २५ हजार ५२० रुपये आहे. या सगळ्याची एकूण किंमत ही ३३ लाख रुपयांच्या जवळपास आहे.
आणखी वाचा : ‘…चुपचाप खड़ा रह’, नीरज चोप्राचा डायलॉग ऐकून बिग बींची बोलती बंद

आणखी वाचा : दिया मिर्झाने मुलाचा पहिला फोटो केला शेअर, कमेंट करत प्रियांका म्हणाली…
दरम्यान, शाहरूख दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. शाहरुख सध्या ‘पठाण’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘पठाण’ या चित्रपटात पहिल्यांदा शाहरुख आणि जॉनला एकत्र पडद्यावर पाहायला मिळणार आहे.