शनिवारी रात्री मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर एनसीबीने छापा टाकला. या छाप्यामध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसोबत आणखी लोकांना ताब्यात घेण्यात आले. रविवारी आर्यनला अटक करण्यात आली. या प्रकरणी आर्यन खानला येत्या ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या एनसीबी कोठडीत असलेल्या सर्वांची कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान, कोठडीत आर्यनला काही नीट जेवायला मिळत नसणार हा विचार करत आई गौरी खान त्याच्यासाठी बर्गर घेऊन गेल्याचे समोर आले आहे.
गौरीला तिच्या मुलाच्या आहाराबद्दल काळजी होती. त्याला नीट जेवायला मिळत नसणार हा विचार करता गौरी त्याच्यासाठी McD चे काही बर्गरसोबत घेऊन गेली होती. मात्र, एनसीबीने विनम्रपणे गौरीची ही विनंती नाकारली आणि सुरक्षा कारणास्तव यासाठी नकार दिला. ज्याप्रमाणे त्यांनी इतर आरोपींना कोठडीत असताना घरगुती जेवणास नकार दिला त्याच प्रमाणे त्यांनी गौरीला ही नकार दिला.
आणखी वाचा : “उमेश माझा जुनाच गडी पण…”; लग्नाच्या दहाव्या वाढदिवसानिमित्त प्रियाचा खास उखाणा
आणखी वाचा : आर्यनची केस लढणारे सतीश मानेशिंदे एका दिवसासाठी घेतायत इतकी फी…
चौकशी दरम्यान आर्यनने शाहरुख विषयी एक धक्का दायक खुलासा केला होता. आर्यनच्या म्हणण्याप्रमाणे, “माझे वडील शाहरुख खान गेल्या काही वर्षांपासून कामात फार व्यस्त असतात. त्यामुळे मला त्यांना भेटण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागते,” असे त्याने म्हटले. तर शाहरुखने आर्यनशी भेटण्यासाठी एनसीबीकडून परवानगी घेतली. त्यानंतर आर्यन शाहरुखसमोर रडू लागल्याचे म्हटले जाते.