१९९३ साली ‘बाजीगर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सुपरहिट ठरला. ‘बाजीगर’मधील शाहरुख खानने साकारलेली खालनायकाची भूमिका आजही चित्रपटसृष्टीतील त्याच्या करिअरचा एक महत्त्वाचा टप्पा मानली जाते. त्यावेळी चित्रपटसृष्टीत नवीन असलेल्या शाहरुखसाठी ही भूमिका साकारणे एक मोठे आव्हान होते. परंतु ही नकारात्मक भूमिका साकारत तो एक चतुरस्त्र अभिनेता आहे हे त्याने सगळ्यांसमोर सिद्ध केले. परंतु या भूमिकेसाठी दिग्दर्शक अब्बास-मस्तान यांना शाहरुखला नव्हे तर दुसऱ्याच अभिनेत्याला कास्ट करायचे होते, असा खुलासा त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला.
हेही वाचा : फक्त ‘ब्रह्मास्त्र’च नव्हे तर ‘या’ चित्रपटांमध्येही केला होता शाहरुख खानने कॅमिओ
अब्बास-मस्तान यांनी ‘पिंकविला’च्या एका मुलाखतीत खुलासा केला की, या चित्रपटाची ऑफर सर्वप्रथम अभिनेते अनिल कपूर यांना देण्यात आली होती. परंतु त्यांनी हा चित्रपट करण्याला नकार दिला. अनिल कपूर अब्बास – मस्तान यांना म्हणाले, “सध्या मी ज्या प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम करत आहे ते बघता मी ही भूमिका करू शकणार नाही.”
त्यानंतर ‘फौजी’मध्ये काम करणारा अभिनेता अमृत पटेल याने अब्बास मस्तान यांना या भूमिकेसाठी शाहरुख खानचे नाव सुचवले. अमृत म्हणाला, “शाहरुख खूप जिद्दी आणि मेहनती आहे, तो हे काम चांगले करेल.” निर्माते रतन जैन यांनीही शाहरुखला बोलावण्यास संमती दर्शवली.
ठरल्यानुसार अब्बास – मस्तान शाहरुख खानला भेटायला गेले. त्या भेटीत शाहरुख खानने त्यांना कथा ऐकावण्यास सांगितली. त्यावर अब्बास – मस्तान यांनी “या चित्रपटाची कथा या चित्रपटाचे लेखक तुला ऐकावतील,” असे शाहरुखला सांगितले. परंतु ही कथा अब्बास मस्तान यांनीच ऐकवावी अशी त्याची मागणी होती. शाहरुख म्हणाला, “तुम्ही जोपर्यंत माला ही कथा स्वतः ऐकवत नाही तोपर्यंत तुम्हाला या चित्रपटातून नक्की काय अपेक्षित आहे हे मला समजणार नाही.”
आणखी वाचा : जेव्हा सलमान खानच्या रागामुळे ऐश्वर्याचं झालं होतं मोठं नुकसान, शाहरुखनेही समजावलं पण…
शाहरुखच्या म्हणण्यानुसार अब्बास – मस्तान यांनी शाहरुखला ‘बाजीगर’ची कथा ऐकावली, त्याची भूमिका कशी असेल याची सविस्तर माहिती दिली. या चित्रपटाची कथा शाहरुखला इतकी आवडली की सगळं ऐकल्यावर शाहरुखने लगेचच ‘बाजीगर’ हा चित्रपट करायला होकार दिला.
या चित्रपटात शाहरुख खानने अतिशय छान काम करत प्रेक्षकांना वेड लावले. या चित्रपटाला आणि त्यातील शाहरुख खानच्या भूमिकेला प्रेळशकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. प्रेक्षकांच्या तुफान प्रतिसादामुळे ‘बाजीगर’ हा चित्रपट शाहरुखच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला.