बॉलिवूडचा किंग खान शाहरुख सतत चर्चेत असतो. कधी त्याच्या आगामी चित्रपटांमुळे तर कधी त्याच्या खासगी आयुष्यामुळे. गेली दोन महिने शाहरुखच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ सुरु होता. शाहरुखचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी अटक झाली होती. त्यानंतर आता आर्यन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे म्हटले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉलिवूड लाइफने दिलेल्या वृत्तानुसार, आर्यन खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्याने या संदर्भात काही निर्मात्यांची भेट देखील घेतली असल्याचे म्हटले जाते. पण आता आर्यनचे बॉलिवूडमध्ये पदार्पण थोडे कठीण झाले आहे. कारण जामीन देताना आर्यनला काही अटी घालण्यात आल्या आहेत. त्यामध्ये त्याने त्याचा पासपोर्ट जमा केला आहे. त्यामुळे त्याला भारताबाहेर जाणे शक्य नाही.
आणखी वाचा : श्वेता तिवारीचे हॉट फोटो पाहून पहिल्या पतीने केली कमेंट, म्हणाला…

आदित्य चोप्राचे वायआरएफ आणि करण जोहरचे धर्मा प्रोडक्शन शाहरुखच्या अगदी जवळचे आहे. त्यामुळे आर्यन एका प्रोडक्शन हाऊससोबत काम करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण आर्यन नेमकं काय करणार आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्याच्या नियमातून आर्यन खानला सूट देण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या दिल्ली एसआयटीनं ज्या ज्या वेळी आर्यन खानला चौकशीसाठी पाचारण केलं, त्या त्या वेळी त्याला चौकशीसाठी हजर व्हावं लागेल, अशी अट न्यायालयानं घालून दिली आहे. त्यासोबतच आर्यन खानला मुंबईतून बाहेर जायचं असेल, तर त्यासाठी तपास अधिकाऱ्यांना माहिती देणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahrukh son aryan khan all set for bollywood debut avb