बॉलीवूडचा ‘चॉकलेट बॉय’ शाहीद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या लग्नाचा स्वागत समारंभ रविवार, १२ जुलै रोजी मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. शाहीदच्या लग्नाप्रमाणेच या स्वागत समारंभाची जोरदार चर्चा बॉलीवूडमध्ये आहे. या स्वागत समारंभासाठी खास आमंत्रण पत्रिका तयार करण्यात आली आहे. दिल्लीनिवासी रवीश कपूर यांनी शाहीदच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका तयार केली होती. त्यांच्याच संकल्पनेतून आता स्वागत समारंभाची ही पत्रिका तयार करण्यात आली आहे. निळ्या रंगाच्या मखमली पाकिटात ही छोटेखानी आमंत्रण पत्रिका ठेवण्यात आली आहे. नवरा आणि नवरी दोन खुच्र्यावर बसले आहेत आणि येणारी मंडळी त्यांच्याशी हस्तांदोलन करताहेत, अशा पारंपरिक पद्धतीचा हा स्वागत समारंभ नसावा, असे शाहीदने सुचविले होते. त्यामुळे वेगळ्या प्रकारे हा समारंभ साजरा होणार आहे.
आणखी वाचा