प्रसिद्ध पॉप गायिका शकीरा आणि तिचा दीर्घकाळचा प्रियकर प्रसिद्ध फुटबॉलपटू गेराड पिक या जोडीला दुसऱ्यांदा पुत्रप्राप्ती झाली आहे. बार्सेलोनामधील एका प्रसुतिगृहात या ३७ वर्षीय कोलंबियन सुपरस्टार गायिकेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. शकीराच्या प्रसुतीसाठी टेकनॉन प्रसुतिगृहातील एक पूर्ण मजला या दाम्पत्याने राखीव केला होता. या जोडीच्या अगोदरच्या मुलाचे नाव मिलान असून, त्याचा जन्मदेखील याच प्रसुतिगृहात झाला होता. मिलानच्या वेळी असलेल्या डॉक्टरांनीच शकीराची यावेळची प्रसुती केली. मुलाचे नाव लगेच समजू शकले नसले, तरी स्पॅनिश रेडिओ डीजे असलेल्या गेराडच्या मित्राने मुलाचे नाव आंन्द्रे ओ सचा असण्याची शक्यता वर्तवली आहे.

Story img Loader