चित्रपटसृष्टीत हिरो होण्याचं स्वप्न घेऊन अनेक तरुण मुंबईत पोहोचतात. यातील काहींची स्वप्नं सत्यात उतरतात तर काहींच्या पदरी निराशा पडते. काही वर्षांपूर्वी दिल्लीच्या करोलबाग येथील एक देखणा मुलगाही हिरो होण्याचं स्वप्न उराशी बाळगून मुंबईत पोहोचला होता. पण तो नायक नाही तर भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा खलनायक म्हणून प्रसिद्ध होईल असं त्यालाही वाटलं नव्हतं. हा तरूण होता बॉलिवूडचा खलनायक-कॉमेडियन शक्ती कपूर. शक्ती कपूर असा विचित्र रेकॉर्ड आहे की त्यांनी चित्रपटांमध्ये सर्वाधिक बलात्काराचे सीन्स दिले आहेत. तब्बल ४०० चित्रपटांमध्ये काम केलेल्या शक्ती कपूर यांनी ८० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये बलात्काराचे सीन दिले आहेत.

शक्ती कपूर हे मूळचे दिल्लीतील करोलबाग येथील आहेत त्यांचे वडील कपडे विकण्याचा आणि ट्रेलरिंगचा व्यवसाय करायचे. पंजाबी कुटुंबातून आलेल्या शक्ती कपूर यांच्या आईची इच्छा होती की मुलानेही कौटुंबिक व्यवसाया पुढे न्यावा आणि त्यातच करिअर करावे. पण शक्ती यांना हे मान्य नव्हतं. त्यांना कुटुंबातील लोकांपेक्षा वेगळं काहीतरी करायचं होतं. सुरुवातीला त्यांनी ट्रॅव्हलिंग एजन्सी चालवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी ६ महिन्यांचे प्रशिक्षणही घेतले. पण नंतर त्यांनी पुण्यातील FTT (The Film and Television Institute of India) मध्ये प्रवेश घेतला आणि दोन वर्षांचा डिप्लोमा पूर्ण केला. सुरुवातीला शक्ती कपूर यांना अभिनयात अजिबात रस नव्हता, पण नंतर अभिनय आणि रंगभूमीवर काम करत असताना त्यांना त्यात आवड निर्माण झाली आणि त्यांची FTII साठी निवडही झाली.
आणखी वाचा- “मला मुली आवडतात…” सोहेल खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर सीमा सजदेहचं वक्तव्य चर्चेत

शक्ती कपूर जेव्हा हिरो होण्याचं स्वप्न पाहून मुंबईत आले तेव्हा ते पेइंग गेस्ट म्हणून राहायचे. त्यानंतर अभिनेता विनोद खन्ना यांनी शक्ती कपूर यांना खूप मदत केली. ५ महिने कोणतेही भाडे न घेता त्यांनी शक्ती कपूर यांना आपल्या घरात राहू दिले. शक्ती कपूर यांनी १९७५ मध्ये ‘रणजीत खनाल’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी कन्नड, बंगाली, तमिळ आणि बांगलादेशी चित्रपटांमध्येही काम केले आहे. शक्ती कपूर यांनी नायक म्हणून ‘मदीने की गलियां’, ‘गाझी इंसान’ आणि ‘बेगुनाह’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. पण कॉमेडियन आणि खलनायकाच्या भूमिकांमधून त्यांना प्रसिद्धी मिळाली.

आणखी वाचा- ‘बाहुबली’च्या तब्बल ३६ सीन्सची राजमौलींनी हॉलिवूड चित्रपटांतून केली चोरी? व्हिडीओद्वारे झाला मोठा खुलासा

दरम्यान आपल्या संपूर्ण बॉलिवूड करिअरमध्ये शक्ती कपूर यांनी अनेक वादग्रस्त सीन्स दिले आहेत. ज्यामुळे ते अडचणीतही आले होते. ‘मेरे आगोश में’ या चित्रपटात शक्ती कपूर यांनी टॉपलेस अभिनेत्रीसह ओरल सेक्स करतानाचा एक सीन दिला होता. या वादग्रस्त सीनमुळे त्यांच्यावर बरीच टीका झाली आणि ते अडचणीतही आले होते. या सीनमुळे अनेक महिने या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने मंजुरी दिली नव्हती.

Story img Loader