Siddhanth Kapoor Consumed Drug : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा (Shraddha Kapoor) भाऊ सिद्धांत कपूर (Siddhanth Kapoor) मोठ्या अडचणीत सापडला आहे. सध्या त्याच्यावर ड्रग्ज घेतल्याचा आरोप असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर ओपन ड्रग्ज प्रकरणात अनेक चित्रपट आणि टीव्ही स्टार्सची नावे समोर आली आहेत. आता या यादीत सिद्धांत कपूरचे नाव जोडले गेले आहे. सिद्धांतच्या अटकेनंतर त्याचे वडील शक्ति कपूर (Shakti kapoor) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : KBC 14 : २ हजाराच्या नोटेत जीपीएस ट्रॅकर? चुकीची बातमी पसरवणाऱ्या न्यूज चॅनेलना अमिताभ यांचा टोला

‘ईटाइम्स’ने या प्रकरणात शक्ति कपूर यांच्याशी संपर्क साधता ते म्हणाले, मी फक्त एकच गोष्ट बोलू शकतो आणि ती म्हणजे हे अशक्य आहे. दरम्यान, सिद्धांत रविवारी मुंबईहून बंगळुरूला रवाना झाला होता आणि ही घटना रात्री उशिरा पार्टी दरम्यान घडली. सिद्धांत कपूर कोणत्या हॉटेलमध्ये राहत होता याचीही कपूर कुटुंबियांना माहिती नव्हती.

आणखी वाचा : प्रेक्षक बोंबा मारायला लागले म्हणून भरत जाधवने थांबवलं नाटक; महापौरांना केला कॉल अन्…

आणखी वाचा : अँबर हर्डची ११६ कोटीची नुकसान भरपाई जॉनी डेप करणार माफ, पण ‘या’ अटीवर; वकिलांनी केला खुलासा

बंगळुरूमध्ये छापा टाकून बंगळुरू पोलिसांनी सिद्धांतला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर ड्रग्ज घेतल्याचा आरोप आहे. “ड्रग्स सेवनात दोषी ठरलेल्या ६ लोकांमध्ये सिद्धांत एक आहे. हे सर्व लोक बंगळुरूमधील एमजी रोडवरील एका हॉटेलमध्ये होते, जिथे ही पार्टी सुरु होती. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ तेथे पोहोचून छापा टाकला”, अशी माहिती बंगळुरू पोलिसांनी एनआयला दिली आहे.

आणखी वाचा : लग्नानंतर पतीसोबत तिरुपतीला गेलेली नयनतारा अडकली वादाच्या भोवऱ्यात!

सिद्धांत आधी ड्रग्स प्रकरणात दीपिका पदुकोणपासून रिया चक्रवर्तीसह अनन्या पांडे, भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांची चौकशी करण्यात आली होती. सिद्धांत हा ३७ वर्षांचा आहे. सिद्धांतने ‘शूटआउट अॅट वडाला’, ‘हसीना पारकर’, ‘जज्बा’ आणि क्राइम-थ्रिलर वेब सीरिज ‘भौकाल’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shakti kapoor reacts to son siddhanth kapoor s drugs test says it s not possible dcp