बॉलिवूड अभिनेता शक्ती कपूर हे त्यांच्या नकारात्मक भूमिकेसाठी ओळखले जातात. पण त्यांची कॉमेडी व्यक्तिरेखाही प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे. सध्या शक्ती कपूर यांनी स्वत: ला चित्रपटसृष्टीपासून दूर ठेवले आहे. पण सोशल मीडियावर ते सक्रिय असतात. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकताच त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांचा मॅनेजर त्यांच्या शरिरावर असलेल्या केसांची खिल्ली उडवतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शक्ती कपूरयांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात शक्ती कपूर हे बॉम्बे शेविंग कंपनीच्या नवीन शेव्हरची जाहिरात करताना दिसले. त्यांच्या या जाहिरातीचा व्हिडीओ इतका मजेशीर आहे की सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडिओची सुरुवातीला शक्ती कपूर “अंदाज अपना अपना’ या चित्रपटातील ‘ढाकी टिकी’ हा त्यांचा फेमस डायलॉग साउंडचेक करण्यासाठी बोलतात. तर व्हिडीओच्या पार्श्वभूमीला लोकांचा हसायचा आवज येतो. मात्र, त्यांच्या शेजारी असलेल्या व्यक्ती हसत नाही हे लक्षात आल्यानंतर ते त्याला तू हसत का नाहीस? त्यावर ती व्यक्ती म्हणते, तुझ्या छातीचे केस माइकला थोडे त्रास देत आहेत.”

आणखी वाचा : लग्न आलिया रणबीरचं पण चर्चा तैमूरच्या Attitude ची, पाहा Viral Video

आणखी वाचा : Ranbir Alia Wedding : आलिया-रणबीरने ७ नाही तर घेतले ४ फेरे, भाऊ राहुल भट्टने केला खुलासा

त्या माणसाचे बोलणे ऐकून शक्ती कपूर म्हणतात “माणूस आणि केस नेहमी त्यांच्या मुळाशी जोडलेले असले पाहिजेत”. एकदा एक शहाणा शक्ती कपूर म्हणाले, “ज्याच्या छातीवर केस नाहीत त्याला घाबरू नका आणि ज्याच्या पाठीवर केस नाहीत त्याच्या मागे जाऊ नका.” पुढे त्यांचे मीम सोशल मीडियावर व्हायरल होतात असे ते म्हणतात. शक्ती कपूर यांच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत हा मजेशीर असल्याचे म्हटले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shakti kapoor reveals struggle with body hair in hilarious new video dcp