नुकताचं ‘मिर्ची म्युझिक अवॉर्ड’ सोहळा पार पाडला. या पुरस्कार सोहळ्यात ९० च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टी गाजविणारा अभिनेता गोविंदा याचा विशेष सत्कार करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा अगदी सुरळीत पार पडत असतानाचं शक्ती कपूर भडकल्याने सर्व उपस्थित प्रेक्षकांना धक्का बसला.
झाले असे की, गोविंदाचा सत्कार केल्यानंतर त्याच्याविषयी मंचावर उपस्थित असलेल्यांना दोन शब्द बोलण्यासाठी सांगण्यात आले. त्यामध्ये शक्ती कपूर यांचाही समावेश होता. गायिका भूमी त्रिवेदी आणि अदिती सिंग शर्मा यांनी गोविंदाच्या स्तुतीसाठी गाणी गायली. त्यानंतर शक्ती म्हणाले की, माझी मुलगी (श्रद्धा कपूर) गाण म्हणू शकते तर मीसुद्धा गाऊ शकतो. असे म्हणत त्यांनी, ‘लाल चिडिया उड ना जाना..’ हे गाणे म्हणण्यास सुरुवात केली. त्यावर सूत्रसंचालन करत असलेला गायक सोनू निगम याने शक्ती कपूर यांना गाण्याचा अर्थ विचारला. त्यावर शक्ती यांचा पारा चढला आणि ते सोनूला म्हणाले की, तू जेव्हा बोलत असतोस तेव्हा मी तुला कधीचं रोखत नाही. त्यामुळे तू मला बोलू दिलसं तर बरं होईल. शक्ती कपूर यांच्या या वक्तव्याने सर्व उपस्थित व्यक्ती चकित झाले. पण, सोनू निगमने वेळ सांभाळून घेतली आणि काही घडलेच नाही असे समजून पुढे सूत्रसंचालन केले.

Story img Loader