कपिल शर्मा हा हिंदी टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. त्याच्या ‘द कपिल शर्मा शो’चे चाहते जगभरात आहेत. काही महिन्यापूर्वी कपिल आणि त्याची टीम परदेश दोऱ्यासाठी गेली होते. यामुळे हा शो थोड्या कालावधीसाठी बंद करण्यात आला होता. दरम्यानच्या काळात कपिल इतर कामांमध्ये व्यस्त होता. कपिल सोशल मीडियावर सक्रीय आहे. तो इन्स्टाग्रामवर फोटो-व्हिडिओ पोस्ट करत असतो. नुकताच त्याने एका नव्या अवतारातला फोटो पोस्ट करत द कपिल शर्मा शोच्या चौथ्या सिझनची घोषणा केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कपिल शर्मा अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यावर काम करत आहे. त्याने काही चित्रपट देखील केले आहेत. कपिलला अभिनयासह गायनाचीही आवड आहे. द कपिल शर्मा शो मध्ये तो अनेकदा गायला आहे. या शोमध्ये सहभागी झालेल्या बऱ्याच सेलिब्रिटींनी त्याच्या गाण्याचे कौतुक केले होते. नुकतंच कपिलने एका गाण्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमामध्ये शंकर महादेवन, हरीहरन असे संगीत क्षेत्रातील मातब्बर उपस्थित होते. याच कार्यक्रमाचा एक व्हिडीओ कपिलने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
आणखी वाचा-कपिल शर्माशी वाद की कमी मानधन? कृष्णा अभिषेकने शो सोडण्याचं काय आहे नेमकं कारण

कपिल शर्माने शेअर केलेल्या या व्हि़डीओमध्ये कपिल शंकर महादेवन आणि हरीहरन यांच्यासोबत स्टेजवर मजामस्ती करताना दिसत आहे. हरीहरन त्याच्या ‘काश ऐसा कोई मंजर होता..’ गझलची पहिली ओळ म्हणत पुढे कपिलला ती ओळ गायला सांगतात. कपिल गझल गायला लागतो. तेव्हा त्या ठिकाणी असलेले सर्वजण अवाक होतात. दोन ओळी गाऊन कपिल थांबतो आणि ‘हे गायला मीच आठवलो का तुम्हाला ?’ असे हसत म्हणतो. पुढे शंकर महादेवन यांनी ‘जबरदस्त गायक’ म्हणत त्याचे कौतुक केले. या प्रसंगादरम्यान सर्वजण खूप हसत होते. शंकर यांना उत्तर देताना तो म्हणाला, ‘इतकी वर्ष साचून राहिलं होतं. आज सगळं बाहेर निघालं.’

कपिलच्या ‘द कपिल शर्मा शो’चा नवा सीझन १० सप्टेंबरला सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वीच नव्या सीझनचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shankar mahadevan reaction on kapil sharma singing says you are wonderful singer mrj