‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या बहुचर्चित व बहुप्रतिक्षित चित्रपटातील पहिलं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. ‘शंकरा रे शंकरा’ असे या गाण्याचे बोल असून अभिनेता अजय देवगणने या गाण्यावर ठेका धरला आहे. तान्हाजी मालुसरे या मावळ्याच्या पराक्रमाची कथा या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर भव्यदिव्य स्वरुपात पाहायला मिळणार आहे. यामध्ये अजय देवगण तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारत आहे. तर सैफ अली खान राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गाण्याच्या सुरुवातीला अजयच्या तोंडी ‘दुश्मन को हराने से पहले दुश्मन को देखना चाहता हूँ’, हा संवाद ऐकायला मिळतो. गाण्यात सैफ अली खानचीही झलक पाहायला मिळते.

पहा फोटो – ‘तानाजी’तल्या कलाकारांचा लूक बघितला का ?

ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण, सैफ अली खान, काजोल, शरद केळकर, जगपती बाबू, पंकज त्रिपाठी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. पुढच्या वर्षी १० जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.