अभिनेत्री सई ताम्हणकर आणि मराठीतील नवा खलनायक शरद केळकर यांची जोडी आगामी ‘राक्षस’ या चित्रपटातून पहिल्यांदा नायक-नायिका म्हणून एकत्र दिसणार आहे. हिंदी मालिकांमधून अभिनेता म्हणून जम बसवलेल्या शरद केळकरने गेल्या काही वर्षांमध्ये मराठी चित्रपटांकडेही आपला मोर्चा वळवला. निशिकांत कामत दिग्दर्शित ‘लय भारी’ या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत लोकांची पसंती मिळवल्यानंतर चांगल्या मराठी चित्रपटांचे प्रस्ताव शरदकडे येऊ लागले आहेत. तर दुसरीकडे सई ताम्हणकर ही सध्याची आघाडीची अभिनेत्री असल्याने या दोघांना एकत्र रुपेरी पडद्यावर पाहणे ही पर्वणी ठरणार आहे.

निलेश नवलखा व विवेक कजारिया यांची निर्मिती असलेल्या ‘राक्षस’ या चित्रपटाची कथा व दिग्दर्शन ज्ञानेश झोटिंग यांचे आहे.
‘नवलखा आर्ट्स’ व ‘होली बेसिल प्रॉडक्शन’चे आत्तापर्यंत नऊ चित्रपट प्रदíशत झाले आहेत. यातील सात चित्रपटाच्या दिग्दर्शकांना मराठी रुपेरी पडद्यावर दिग्दर्शक म्हणून पदार्पण करण्याची संधी या दोन प्रॉडक्शनमधून मिळाली. यात ‘शाळा’चे सुजय डहाके, ‘सिद्धांत’चे विवेक वाघ, ‘फॅण्ड्री’चे नागराज मंजुळे यांचाही समावेश आहे. नावावरूनच वेगळया वाटणाऱ्या या चित्रपटात शरदसारखा उत्तम अभिनेता आणि त्याला सईसारख्या अनुभवी अभिनेत्रीची साथ हा उत्तम योग जुळून आला आहे.

Story img Loader