आपल्या भारदस्त आवाजासाठी आणि दमदार अभिनय आणि व्यक्तिमत्त्वासाठी ओळखला जाणारा अभिनेता शरद केळकर हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘हर हर महादेव’ या चित्रपटात शरद केळकरने बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली होती, शिवाय तान्हाजी चित्रपटातील त्याने साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली.

याबरोबरच शरद केळकर त्याच्या भारदस्त आवाजासाठी ओळखला जातो. जगभरात नावलौकिक मिळवणाऱ्या ‘बाहुबली’ या चित्रपटातील प्रभासला हिंदीत आवाज शरद केळकरने दिला होता. याबरोबरच मार्वेलच्या ‘गार्डीयन्स ऑफ गॅलक्सि’ आणि ‘मॅडमॅक्स फ्यूरी’सारख्या हॉलिवूडपटांच्या हिंदी डबिंगमध्येसुद्ध शरद केळकरने सहभाग घेतला होता.

priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
kiran gaikwad and vaishnavi kalyankar mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘देवमाणूस’ फेम अभिनेता बोहल्यावर चढणार; होणारी पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, पाहा व्हिडीओ
zee marathi satvya mulichi satavi mulgi serial off air
‘झी मराठी’ची लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! ‘शेवटचा दिवस’ म्हणत कलाकारांनी शेअर केले सेटवरचे फोटो
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
shraddha kapoor andrew garfield
बॉलीवूडची ‘स्त्री’ अन् ‘स्पायडरमॅन’ जेव्हा एकत्र येतात, श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे फोटो पाहून चाहते म्हणाले…

आणखी वाचा : ‘पठाण’च नव्हे तर दीपिकाच्या ‘गहराइयां’मध्येही वापरले आहेत जबरदस्त व्हीएफएक्स; नवा व्हिडिओ होतोय व्हायरल

आता पुन्हा एका मोठ्या हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये शरद केळकरची निवड झाली आहे. मार्वेलच्या ऑडीबल सीरिजमधील ‘wolverine’ या सुपरहिरोला आता शरद केळकर स्वतःचा आवाज देणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. नुकतंच या सीरिजची घोषणा करण्यात आली असून आणखीनही कलाकार या सीरिजमध्ये त्यांचं योगदान देणार आहेत.

शरद केळकरसह करीना कपूर खान, सैफ अली खान, जयदीप अहलावत, आशीष विद्यार्थीसारखे कलाकारही या सीरिजमध्ये वेगवेगळ्या पात्रांना आवाज देणार आहेत. ‘Marvel’s Wastelanders’ ही पॉडकास्ट सीरिज ६ सीझनची असणार आहे. शिवाय आता हिंदी कलाकारांच्या सहाय्याने ही सीरिज आणखी जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहे. शरद केळकरला ‘wolverine’ म्हणून ऐकण्यासाठी चाहते चांगलेच उत्सुक आहेत.

Story img Loader