मराठी नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्हीही माध्यमांवर ठसा उमटवणारे अभिनेते म्हणून शरद पोंक्षेंना ओळखले जाते. ते कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतात. ते विविध मुद्द्यांवर भाष्य करत असतात. शरद पोंक्षे यांना कट्टर सावरकरवादी म्हणून ओळखले जाते. ते कायम त्यांचे विचार सोशल मीडियाद्वारे मांडताना दिसतात. अनेकदा यामुळे त्यांना टीका सहन करावी लागते. नुकतंच शरद पोंक्षे यांना एक मानाचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी स्वत: याबद्दल पोस्ट शेअर केली आहे.
शरद पोंक्षे हे विविध कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल व्याख्यानं देत असतात. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. नुकतंच त्यांना आचार्य कालीदास हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. यानिमित्ताने त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याबरोबर त्यांनी या कार्यक्रमातील काही फोटोही पोस्ट केले आहेत.
आणखी वाचा : “बाबांच्या या विचारसरणीमुळे…” शरद पोंक्षेंवर होणाऱ्या टीकेबद्दल लेकीने दिले स्पष्ट शब्दात उत्तर
“बरीच वर्ष सातत्यान सावरकर व्याख्यानं देतोय पण गेल्या महिन्यात पंढरपूरात हिंदू शौर्य पुरस्कार व आज हिंदूत्वाचे आधारस्तंभ म्हणून “”आचार्य कालीदास””पुरस्कार मिळाला. हिंदू रीसर्च व फाऊंडेशन ह्या संस्थेने दिला त्यांचा व डॉ वैदेही तमन ह्यांचा आभारी आहे. आपल्या कामांची दखल घेतली की बरं वाटतं”, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आणखी वाचा : “मी गायब झालोय असं रोज वाचनात येतं पण…” ‘इंडियन आयडल’ विजेता अभिजीत सावंतने सांगितली सत्य परिस्थिती
दरम्यान त्यांनी पुरस्कार मिळाल्याची पोस्ट शेअर केल्यानंतर अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. खूप खूप अभिनंदन आम्ही हिंदुत्व बळकट करण्यासाठी गॅस , पेट्रोल चे भाव किंवा फुकट वीज या भानगडीत न पडता सरळ भाजपाला दणदणीत जिंकवले. महाराष्ट्रातील लोक यातून काही बोध घेतील, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर एकाने मनःपूर्वक अभिनंदन, आम्हाला तुमचा अभिमान आहे, असे म्हटले आहे.