प्रसिद्ध मराठी अभिनेते शरद पोंक्षे हे त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या परखड राजकीय भूमिका मांडण्यासाठीही ओळखले जातात. शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. देशातील राजकीय घडामोडी, देशाचा इतिहास यावर ते परखडपणे आपली मतं मांडत असतात. बऱ्याचदा त्यांच्या या मतांवर टीकादेखील होते. कट्टर सावरकरवादी विचारांचे शरद पोंक्षे यांना खरी ओळख त्यांच्या अजरामर ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकातून मिळाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे नाटक चांगलंच गाजलं, वादाच्या भोवऱ्यातही अडकलं, यावर जबरदस्त टीकाही झाली. पण लोकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत असल्याने नाटक सुरू होतं. सहा वर्षांपूर्वी या नाटकाचे प्रयोग थांबवण्यात आले होते. परंतु काही महिन्यांपूर्वी खास लोकाग्रहास्तव या नाटकाचे शेवटचे खास ५० प्रयोग आयोजित करण्यात आले. एक व्हिडीओ शेअर करत शरद पोंक्षे यांनी या नाटकाचे शेवटचे ५० प्रयोग करणार असल्याची घोषणा केली अन् महाराष्ट्रात ठिकठिकाणी याचे शो हाऊसफूल झाले.

आणखी वाचा : “आम्ही स्वतःला हिंदू…” गश्मीर महाजनी महाजनीने सोशल मीडिया पोस्टमधून व्यक्त केली खंत

आता पुन्हा हे नाटक अशाच समारोपाकडे आलं असल्याची माहिती शरद पोंक्षे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून केली. आज या नाटकाचा शेवटचा प्रयोग पार पडणार असल्याने शरद पोंक्षे फार भावुक झाले अन् त्यांनी ही पोस्ट त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केली. पोस्टमध्ये ते लिहितात, “आज नथुराम गोडसेचा शेवटचा प्रयोग. माझ्याबरोबर काम करणाऱ्या सर्व कलाकार तंत्रज्ञांनी हे पोस्टर बनवून कालीदास मुलुंडच्या गेटवर लावलं. हे त्यांना करावंसं वाटलं, एवढं प्रेम ते करतात म्हणूनच २५ वर्षे ही टीम टिकली.”

फोटो : सोशल मीडिया

पुढे शरद पोंक्षे लिहितात, “आता आज ४.३० ते ७.३० या वेळात शेवटचं नथुराम रूपात मी बोलेन, मग पूर्णविराम . मग नवीन नाटक ‘हिमालयाची सावली’ नोव्हेंबर २०२४ मध्ये घेऊन येईन तोपर्यंत धन्यवाद.” शरद पोंक्षे यांनी हे नाटक अनेक वर्ष केले. या नाटकादरम्यान त्यांना धमकीचे फोनदेखील आले होते. मात्र त्यांनी आणि नाटकाच्या पूर्ण टीमने न घाबरता या नाटकाचे प्रयोग सुरु ठेवले. या नाटकाने १००० प्रयोग केले. महाराष्ट्राचं नव्हे तर गोव्यातदेखील या नाटकाने हाऊसफुल्लचे बोर्ड बघितले. या नाटकाचे लेखन प्रदीप दळवी यांनी केले होते. तर विनय आपटे यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले होते.