प्रसिद्ध मराठी अभिनेते शरद पोंक्षे हे त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या परखड राजकीय भूमिका मांडण्यासाठीही ओळखले जातात. शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. देशातील राजकीय घडामोडी, देशाचा इतिहास यावर ते परखडपणे आपली मते मांडत असतात. बऱ्याचदा त्यांच्या या मतांवर टीकादेखील होते.

काही दिवसांपूर्वी ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाबद्दल शरद पोंक्षे अगदी भरभरून बोलले होते. त्यांचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. आता पुन्हा याच चित्रपटाचा संदर्भ देत, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांबद्दल भाष्य करताना शरद पोंक्षे यांचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.

Sharad Pawar Dhananjay Munde
Sharad Pawar : “सत्ता फार लवकर डोक्यात गेली”, शरद पवारांचा धनंजय मुंडेंना टोला; म्हणाले, “अडचणींच्या काळात…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Sharda Sinha, Chhath Puja songs, Bihar,
शारदा सिन्हा… छठ पूजा गीतांना अजरामर करणारी ‘बिहार कोकिळा’
Loksatta vyaktivedh Dairy personality Ravindra Pandurang Apte former president of Gokul passed away
व्यक्तिवेध: रवींद्र आपटे
Sharad Pawar
Sharad Pawar : “राज्यात ‘मविआ’चं सरकार आल्यास ३ लाखांपर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार”, शरद पवारांचं मोठं आश्वासन
Supriya Sule, Baramati Assembly, Supriya Sule on Baramati Assembly, candidate, Ajit Pawar, Jay Pawar , Yugendra Pawar, NCP, Sharad Pawar
सततच्या बाहेर राहण्यामुळे मुलेही मावशी म्हणू लागली, सुप्रिया सुळे यांची कोटी
bigg boss marathi jahnavi killekar and suraj chavan
“घन:श्यामवर कोणीच विश्वास ठेऊ नये, तो प्रचंड…”, जान्हवीने स्पष्टच सांगितलं; सूरज चव्हाणच्या लग्नाबद्दल म्हणाली…

आणखी वाचा : ‘द केरला स्टोरी’चा बॉक्स ऑफिसवर डंका; लवकरच गाठणार १५० कोटींचा टप्पा, कमावले ‘इतके’ कोटी

या व्हिडीओमध्ये शरद पोंक्षे हे सावरकर यांनी लिहिलेले ‘काळे पाणी’ हे पुस्तक वाचताना दिसत आहेत. हे पुस्तक वाचताना सहज त्यांनी प्रेक्षकांशी व्हिडीओच्या माध्यमातून संवाद साधला आहे. शरद पोंक्षे म्हणाले, “मी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेली ‘काळे पाणी’ ही कादंबरी वाचत आहे. आज ‘द केरला स्टोरी’मुळे बरेच हिंदू जागरूक झाले आहेत. सावरकर गेली सव्वाशे वर्षे हिंदूंना जागृत करण्यासाठी धडपडत आहेत. १९६६ मध्ये ते गेले, पण आमच्यासारख्या व्याख्यात्यांच्या माध्यमातून आम्ही सावरकर मांडायचा प्रयत्न करतो.”

पुढे शरद पोंक्षे म्हणाले, “सावरकरांनी संपूर्ण आयुष्य हिंदू धर्म आणि हिंदुत्वासाठी वेचले. तरी हिंदू एक होत नाहीये, अजूनही जागा होत नाहीये यासारखे दुःख नाही. ऐकू या सावरकर, वाचू या सावरकर. आपण सगळ्यांनी एक होऊ या. हिंदू धर्मातील सर्व जाती संपवून हिंदू ही एकमेव जात निर्माण करू या. हेच या माणसाने स्वप्न पाहिले. ते आपण पूर्ण करू या.” शरद पोंक्षे यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.