नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्हीही माध्यमातून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते म्हणजे शरद पोंक्षे. आपल्या उत्तम अभिनय शैलीमुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारे अभिनेते म्हणून त्यांना ओळखले जाते. शरद पोंक्षेंची मुख्य भूमिका असलेले ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता या नाटकाचा दौरा अमेरिकेत आयोजित करण्यात आला आहे.

प्रदीप दळवी लिखित आणि विनय आपटे दिग्दर्शित ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक वादविवादात अडकल्यामुळे थांबवावे लागले होते. त्यानंतर आता सहा वर्षांनी हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर प्रेक्षकांच्या भेटीला आले. या नाटकाचे ५० प्रयोग पार पडले.
आणखी वाचा : “तू परत आल्याने मालिकेमध्ये…”, अनिता दातेसाठी ‘नवा गडी नवं राज्य’मधील अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली…

sharad pawar rain speech
Sharad Pawar: “मी बोलायला लागलो की पाऊस येतो आणि निकाल…”, शरद पवारांचं सूचक विधान; पावसातल्या ‘त्या’ सभेची पुन्हा चर्चा!
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Sharad Pawar Eknath shinde Ajit pawar
Sharad Pawar : अजित पवारांचा शिंदेंना दम? शरद पवारांकडून भर सभेत मिमिक्री; म्हणाले, “शिंदेंनी मला विनंती केली, समजून घ्या…”
Sharad Pawar on ajit pawar
Sharad Pawar : अजित पवारांचा परतीचा मार्ग मोकळा? शरद पवारांच्या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या
What Sharad Pawar Said?
Sharad Pawar : “मोदी ४०० हून अधिक जागांची मागणी करत होते कारण..”, शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
Sharad Pawar on age
Sharad Pawar : “मी काय म्हातारा झालोय का? इथं एक म्हातारं…”, शरद पवारांचा मिश्किल सवाल; म्हणाले, “या लोकांच्या हाती…”
Sharad Pawar Dhananjay Munde
Sharad Pawar : “सत्ता फार लवकर डोक्यात गेली”, शरद पवारांचा धनंजय मुंडेंना टोला; म्हणाले, “अडचणींच्या काळात…”

यानंतर आता हे नाटक सातासमुद्रापार इतिहास रचण्यासाठी सज्ज झाले आहे. शरद पोंक्षेंची मुख्य भूमिका असलेल्या ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाचा अमेरिका दौरा आयोजित करण्यात आला आहे. पुढच्या वर्षी ऑगस्ट २०२४ मध्ये या नाटकाचा दौरा होणार आहे.

दरम्यान शरद पोंक्षे हे गेली अनेक वर्ष या नाटकाच्या प्रमुख भूमिकेत झळकत आहेत. या नाटकादरम्यान त्यांना धमकीचे फोनदेखील आले होते. मात्र त्यांनी आणि नाटकाच्या पूर्ण टीमने न घाबरता या नाटकाचे प्रयोग सुरु ठेवले. या नाटकाने १००० प्रयोग झाले होते. त्यावेळी सर्वत्र हाऊसफुल्लचे बोर्ड पाहायला मिळाले. ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाचे प्रयोग २०१७ साली थांबवण्यात आले होते. त्यानंतर ऑक्टोबरपासून या नाटकाचे प्रयोग पुन्हा नव्याने रंगभूमीवर प्रदर्शित झाले.

आणखी वाचा : “मी सकाळी १० वाजता घर सोडायचो आणि रात्री घरी यायचो, कारण…”, गौरव मोरेने सांगितला ‘तो’ किस्सा

या नव्या नाटकाचे दिग्दर्शन विवेक आपटे करीत असून उदय धुरत हे सादरकर्ते आहेत. तर माऊली नाट्यसंस्थेतर्फे या नाटकाची निर्मिती करण्यात आले आहे. या नाटकाला विविध सामाजिक घटकांकडून तीव्र विरोध झाला असला तरी आता प्रेक्षक याला भरघोस प्रतिसाद देताना दिसत आहेत.