प्रसिद्ध मराठी अभिनेते शरद पोंक्षे हे त्यांच्या अभिनयाबरोबरच परखड राजकीय भूमिका मांडण्यासाठीही ओळखले जातात. शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. देशातील राजकीय घडामोडी, इतिहास यावर ते परखडपणे आपली मतं मांडत असतात. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर शरद पोंक्षेंनी शेअर केलेली फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “मतदात्याच्या बोटाला शाही नाही चुनाच…”, महाराष्ट्राच्या राजकारणावर ‘बिग बॉस मराठी’ फेम उत्कर्ष शिंदेने मांडले स्पष्ट मत

राष्ट्रवादीचा मोठा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर सोशल मीडियावर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. अजित पवारांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेल्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादीच्या काही आमदारांनासह अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यामुळे राज्यातील या सत्तानाट्यावर प्रतिक्रिया देत शरद पोंक्षे लिहितात, “तत्व, वैचारिक बैठक, नितीमत्ता हे शब्द आज वारले.”

हेही वाचा : “खेळ तर आता सुरू…”, महाराष्ट्राच्या राजकारणावर मराठी अभिनेत्याने केलेले ट्वीट चर्चेत

शरद पोंक्षेंनी केलेल्या या पोस्टवर अनेक नेटकरी व्यक्त झाले आहेत. एका युजरने “या अशा गोष्टी करून कुबड्या घेतलेले सरकार बनवण्यापेक्षा कामे करून बळकट व्हा…”, तर दुसऱ्या एका युजरने “गद्दारी , भाऊबंदकी आणि स्वार्थी राजकीय लोकांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान विकला” अशा कमेंट्स केल्या आहेत.

शरद पोंक्षे यांची फेसबुक पोस्ट

दरम्यान, गेल्या तीन वर्षात अजित पवारांनी तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राजभवनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad ponkshe share post on maharashtra politics after ajit pawar oath as dcm sva 00
Show comments