मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या उत्तम अभिनय शैलीमुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारे अभिनेते शरद पोंक्षे. अनेक चित्रपट, नाटक आणि मालिका यांच्या माध्यमातून त्यांनी कायमच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. कधी गंभीर तर कधी विनोदी भूमिका शरद पोंक्षेंनी साकारल्या. शरद पोंक्षे यांचं ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ (Mi Nathuram Godse Boltoy) हे नाटक चांगलचं गाजलं होतं. या नाटकाच्यावेळी तर त्यांना अनेक प्रसंगांना सामोर जावं लागलं. एका मुलाखतीत त्यांनी याच नाटकातला एक प्रसंग शेअर केला होता.
आणखी वाचा : “विकीच्या जागी कोणी दुसरा असता…”, सुशांतच्या मृत्युनंतर आलेल्या अनुभवावर अंकिता झाली व्यक्त
शरद पोंक्षेंनी खुपते तिथे गुप्ते हा कार्यक्रमात‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकाविषयी आणि त्यांना आलेल्या अनेक प्रसंगांविषयी सांगितले होते. “हा किस्सा चंद्रपूर इथे घडला आहे. रात्री ९.३० चा प्रयोग होता आणि खूप लांबून लोक प्रयोगाला आले होते. या भागात नाटकांचे जास्त प्रयोग होत नसल्याने अनेकजण बायकामुलांसह सहकुटुंब आले होते. साधारण अडीच तासात संपणारं नाटक त्यादिवशी पहाटे ६. वाजता संपलं. कारण नाटक सुरु झाल्यावर मधेच १५० च्या आसपास लोक ऐन प्रयोगात घुसली आणि खूप मोठा राडा सुरु झाला. जो राडा रात्री सुरु झाला तो पहाटेपर्यंत चालू होता आणि अचानक घुसलेल्या या लोकांनी तोडफोड सुरु केली. पण एकही प्रेक्षक प्रेक्षागृहातून बाहेर पडला नाही. पूर्ण वेळ आम्ही प्रेक्षकांच्या पाठिंब्याने त्या दंगेखोरांशी लढत होतो. अखेर पहाटे साडे चारला वातावरण निवलं आणि सुरळीत प्रयोग सुरु झाला. नाटकाबद्दल इतके वाद सुरु असतानाही प्रेक्षकांनी कधीच नाटकाकडे पाठ फिरवली नाही यात त्यांचं प्रचंड कौतुक आहे,” असे शरद पोंक्षे यांनी त्यांना आलेल्या या थरारक अनुभवांविषयी सांगितले.
आणखी वाचा : लवकरच येणार The Kashmir Files चा सीक्वेल, शिवसेनेचं नाव घेत विवेक अग्निहोत्री यांची घोषणा!
आणखी वाचा : “मी सलमान खानला कधीच घेतल नसतं कारण…”, ‘मुळशी पॅटर्न’च्या हिंदी रिमेकवर प्रवीण तरडेंच वक्तव्य चर्चेत
शरद पोंक्षे यांचं ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक प्रचंड गाजलं. या नाटकाला जितका प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला तसाच नाटकाला विरोध सुद्धा झाला होता. अनेक मोर्चे, निदर्शनं यातून वाट काढत खुद्द प्रेक्षकांना सुद्धा नाटकाला येताना विचार करून यावं लागत होतं. मात्र प्रेक्षकांनी या नाटकाला कायम हाऊसफुल प्रतिसाद दिला. त्यामुळे या नाटकाच्या कित्येक प्रयोगांना कायम हाऊसफुलचाच बोर्ड लागला. हे नाटक गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेंचा जीवनप्रवास सांगणारं होतं. या नाटकाचा विषय खूप वादातीत असल्याने तत्कालीन राजकीय पक्षांनी आणि अनेकांनी या नाटकाला विरोध केला आणि ठिकठिकाणी प्रयोग बंद पाडायची सत्र सुद्धा चालू झाली होती.