शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता शरद पोंक्षेंनी एकनाथ शिंदे यांना न कळत एक पोस्ट शेअर करत पाठिंबा दिला होता. त्यावरून आदेश बांदेकर यांनी शरद पोंक्षेंचा एक जुना व्हिडीओ शेअर करत त्यांना सवाल केला होता. आता यावर शरद पोंक्षेंने सडेतोड उत्तर दिले आहे.

आणखी वाचा : अँबर हर्ड प्रकरणानंतर Disney ने मागितली जॉनी डेपची माफी, २ हजार कोटींची दिली ऑफर

शरद पोंक्षेंनी त्यांच्या फेसबूक अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये शरद पोंक्षेंनी त्यांच्या पुस्तकातील पानाचा एक फोटो शेअर केला आहे. त्या पानावर शरद यांनी त्यांच्या कर्करोगाविषयी सांगितले. कशा प्रकारे सगळ्यात आधी त्यांना आदेश बांदेकर यांची आठवण आली आणि ते त्यांच्यासाठी कसे धावून आले. यावेळी आदेश बांदेकर यांची स्तूती करताना शरद म्हणाले, “असा हा आदेश, सहृदयी माणूस!” ही पोस्ट शेअर करत “शरद पोंक्षे कधीही काहीही विसरत नाही”, असे कॅप्शन त्यांनी दिले आहे. यासोबतच त्यांनी आदेश बांदेकर यांना टॅगही केले आहे. शरद पोंक्षे यांची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

आणखी वाचा : वडील अभिषेकचा डान्स कसा वाटला? मनिष पॉलच्या प्रश्नावर आराध्याने दिले असे उत्तर

पाहा शरद पोंक्षें यांची पोस्ट

आणखी वाचा : हा शरद पोंक्षे तूच ना? जुना व्हिडीओ शेअर करत आदेश बांदेकरांनी केला सवाल

काय म्हणाले होते आदेश बांदेकर?

आदेश बांदेकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शरद पोंझेंनी दिलेल्या मुलाखतीचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. शरद पोंक्षेंनी २०१९ साली लोकसत्ता डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या कर्करोगाच्या लढ्याविषयी सांगितले होते. या व्हिडीओ शरद पोंक्षें म्हणाले, “सगळ्यात पहिले धावून आला तो आदेश बांदेकर. आदेश म्हणाला कसली काळजी करू नकोस, मी आदेशला फोन केला आणि सांगितले की अशी-अशी शक्यता आहे असे ते सांगत आहेत. तर काय करू मला आता कळत नाही आहे. आदेश बांदेकर म्हणाले, काळजी करू नकोस, मी उद्याच्या उद्या तुला नांदेकडे पाठवतो. हिंदू कॉलनीतील नांदे हे खूप मोठे डॉक्टर आहेत. त्यांच्याकडे पाठवले आणि मग ती सगळी प्रोसेस सुरु झाली. तर अशा प्रकारे पहिला आदेश उभा राहिला. आदेशमुळे उद्धव ठाकरेंना कळलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंचा फोन आला. ते म्हणाले, शरद कसली काळजी करू नकोस शिवसेना आणि मी तुझ्या पाठीशी उभे आहोत. पैशापासून कसली काळजी करायची नाही.” हा व्हिडीओ शेअर करत “हा शरद पोंक्षे तूच ना ?” असा सवाल आदेश बांदेकर यांनी केला आहे.

आणखी वाचा : आलियाच्या प्रेग्नेंसीच्या बातमीनंतर तैमूरला आलं टेन्शन

आणखी वाचा : “हॉस्पिटलमध्ये एकनाथ शिंदेंचा फोन आला, म्हणाले…”, शरद पोंक्षेंची पोस्ट चर्चेत

शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि पोस्ट शेअर करत ते त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात.

Story img Loader