मध्य मुंबईतील महत्त्वाचं शारदा चित्रपटगृह बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कराराचे नूतनीकरण न झाल्याने या चित्रपटगृहाला आता टाळं ठोकण्यात येणार आहे. १९७२ मध्ये सुरू झालेल्या या चित्रपटगृहचा करार ३० नोव्हेंबर रोजी संपला असून, आता शारदा चित्रपटगृहाचा ताबा मुंबई मराठी ग्रंथालयाकडे आहे.

दादा कोंडके यांनी इथं मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यास सुरूवात केली होती. ‘रामराम गंगाराम’, ‘ह्योच नवरा हवा’ यांसारखे मराठी चित्रपट इथे प्रदर्शित झाले. दादरमधल्या मराठी वर्गाचं हक्काचं चित्रपटगृह म्हणून याची ओळख निर्माण झाली होती.

वाचा : विद्या बालनचा ‘तुम्हारी सुलू’ वादाच्या भोवऱ्यात

तर ‘नमक हराम’, ‘यादों की बारात’, ‘शर्मिली’ यांसारखे हिंदी चित्रपटसुद्धा इथे प्रदर्शित झाले होते. मराठी चित्रपट इथे प्रदर्शित व्हायला सुरु होण्यापूर्वी हिंदी चित्रपटांसाठी शारदा चित्रपटगृह ओळखलं जायचं. आता ४५ वर्षांनी हे चित्रपटगृह बंद होण्याच्या मार्गावर आहे.

Story img Loader