‘शार्क टॅंक इंडिया’च्या दोन्ही पर्वांना तरुणवर्ग, उद्योजकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे दोन्ही सीझन चांगलेच लोकप्रिय झाले होते. आता ‘शार्क टॅंक इंडिया’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे, कारण या कार्यक्रमाचे नवीन पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सोनी लिव्ह’ने या संदर्भात घोषणा केली असून याचा एक मजेशीर प्रोमो रिलीज करण्यात आला आहे.
‘शार्क टॅंक इंडिया’च्या तिसऱ्या सीझनच्या प्रोममध्ये एक बिझनेसमन पुरस्कार स्वीकारताना दाखवण्यात आले आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर हा बिझनेसमन सांगतो, “मी घरातून बाहेर निघालो तेव्हा माझ्या खिशात फक्त दहा रुपयांची नोट होती, मला खूप कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला. खिशात एक लाखांचा चेक होता, याशिवाय वडिलांच्या खात्यात फक्त ५० लाख रुपये होते आणि माझ्या काकांनी दिलेल्या १० कोटींच्या सरकारी कंत्राटावर मी जगलो आहे. हेलिकॉप्टरमधून इकडे तिकडे फिरणे सोपे नव्हते.” यानंतर एक व्यक्ती येते आणि म्हणते, “यांच्यासारखं तुमच्या बिझनेसला बाबा, काका, मामा यांचे सहकार्य मिळणार नाही. पण, ‘शार्क टॅंक इंडिया’कडून नक्की मदत मिळेल त्यामुळे वाट न पाहता लगेच रजिस्ट्रेशन करा.” असा प्रोमो रिलीज करीत प्रेक्षक व उद्योजकांना नव्या सीझनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘शार्क टॅंक इंडिया’च्या नव्या सीझनमध्ये सहभागी होण्यासाठी उद्योजकांना सोनी लिव्ह अॅप डाऊनलोड करावे लागेल किंवा sonylive.com वर लॉग इन करून रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. यानंतर सहभागी उद्योजकांना त्यांचा तीन मिनिटांचा व्हिडीओ शेअर करावा लागेल. जे उमेदवार प्राथमिक प्रक्रियेत पात्र ठरतील त्यांना ऑडिशनसाठी बोलावण्यात येईल. ऑडिशनमध्ये निवडलेल्या उमेदवाराला ‘शार्क टँक इंडिया’मध्ये सहभागी होण्याची संधी मिळते.
यापूर्वीच्या दोन सीझनमध्ये अशनीर ग्रोव्हर, अमन गुप्ता, विनिता सिंग, अनुपम मित्तल, पीयूष बन्सल, नमिता थापर, अमित जैन यांनी या कार्यक्रमाचे परीक्षण केले होते. उमेदवारांना या परीक्षकांच्या समोर आपली कंपनी आणि उत्पादनांबाबत माहिती द्यावी लागते. तिसर्या सीझनच्या प्रोमोला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून याची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत आहे.