भारतीय चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरलेल्या थ्री इडियट्स चित्रपटाच्या सिक्वलमध्ये काम करण्यास अभिनेता शर्मन जोशी उत्सुक आहे. दिग्दर्शक राजकुमार हिरानी ‘थ्री इडियट्स’चा सिक्वल तयार करण्याचा विचार करत असल्याचे वृत्त आल्यानंतर शर्मन जोशीनेही त्यास दुजोरा दिला आहे. शर्मन म्हणाला की, थ्री इडियट्सचा सिक्वल तयार करण्याचा विचारात असल्याचे ते(राजकुमार) म्हणाले होते. चित्रपटाची कथा लेखनाचे काम पूर्ण होण्याची मी वाट पाहत असून, चित्रीकरणाला केव्हा सुरूवात होईल याबाबत मी खूप उत्सुक आहे.
थ्री इडियट्स चित्रपट बॉलीवूडसाठी एक टर्निंग पॉईंट ठरला होता. चित्रपटाने अनेक पुरस्कारांसह बॉक्स ऑफीसवर बक्कळ कमाई केली होती. अभिनेता आमीर खान, आर.माधवन, शर्मन जोशी यांच्यासह अभिनेत्री करीना कपूर, अभिनेते बोमन इराणी आणि ओमी वैद्य यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.

Story img Loader