शाहरूख खानच्या बहुप्रतिक्षित ‘फॅन’ या चित्रपटाचा टीझर गुरूवारी प्रदर्शित झाला. खुद्द शाहरूख खाननेच ट्विटरवरून चाहत्यांना याबद्दल सांगितले.


बॉलीवूड चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या शाहरूख खानच्या या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून इंडस्ट्रीत मोठ्याप्रमाणावर चर्चा आहे. मनिष शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाच्या टीझरमध्ये सबकुछ शाहरूख असाच प्रकार आहे. चाहत्यांच्या अमाप प्रेमाचा धनी असलेला शाहरूख, त्याची एक झलक पाहण्यासाठी जमलेली गर्दी अशी दृश्ये या ३० सेकंदाच्या टीझरमध्ये आहेत. मात्र, त्यावरून चित्रपटात नेमके काय असेल, याची कल्पना येत नाही. सूत्रांच्या माहितीनूसार, या चित्रपटात एकही गाणे किंवा नृत्य नाही. ही गोष्ट शाहरूख खानच्या आजवरच्या रोमँटिक प्रतिमेला छेद देणारी आहे. सध्या टीझरमुळे चाहत्यांची चित्रपटाविषयची उत्सुकता वाढली असली तरी ‘फॅन’ पाहण्यासाठी पुढच्यावर्षीपर्यंत वाट पाहवी लागणार आहे. येत्या १५ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल, असा अंदाज निर्मात्यांकडून वर्तविण्यात आला आहे.

Story img Loader