मराठी अभिनेत्री शर्वरी वाघने ‘बंटी और बबली 2’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण चित्रपटापेक्षा ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून शर्वरी वाघ ही विकी कौशलचा भाऊ अभिनेता सनी कौशलला डेट करत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नालाही शर्वरीही उपस्थित होती. त्यामुळे या चर्चांना अधिकच उधाण आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विशेष म्हणजे शर्वरी आणि सनी कौशल हे दोघेही एकत्र मुंबई विमानतळावर दिसले होते. त्यामुळे या दोघांमध्ये नेमकं काय चाललंय? अशी चर्चा सर्वत्र सुरु होती. हे दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचेही बोललं जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. शर्वरी वाघने नुकतंच लग्नाच्या या चर्चांवर स्पष्टीकरण दिले आहे.

‘इंडिया डॉट कॉम’ने दिलेल्या माहितीनुसार, शर्वरी वाघ सनी कौशलला डेट करण्याच्या चर्चांवर स्पष्टीकरण देताना म्हणाली की, “या सर्व अफवा आहेत. आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत. गेल्या ४ वर्षांपासून आमची चांगली मैत्री आहे. अफवा या अफवाच असतात. त्यामुळे आमच्यामध्ये काहीतरी आहे ही देखील एक अफवा आहे.” शर्वरी आणि सनी कौशल यांनी कबीर खानच्या ‘द फॉरगॉटन आर्मी’ या वेबसीरीजमध्ये एकत्र काम केले होते.

‘…त्यांना ‘दुर्गा’ म्हणा’; हेमा मालिनी यांच्या डान्स परफॉर्मन्सवर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची प्रतिक्रिया

सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी शर्वरी वाघने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. त्यासोबत अनेक हिंदी चित्रपटांमध्ये तिने असिस्टंट म्हणून काम केले आहे. त्यानंतर तिने ‘बंटी और बबली 2’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही. पण तरीही शर्वरी वाघही कायमच लोकप्रिय आहे.

कोण आहे अभिनेत्री शर्वरी वाघ?

ज्येष्ठ शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हे शर्वरीचे आजोबा. मनोहर जोशी यांची मुलगी नम्रता वाघ यांची मुलगी शर्वरी आहे. शर्वरीच्या वडिलांचं नाव शैलेश वाघ आहे. दरम्यान, शर्वरी बंटी और बबली २ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात ती अभिनेता सिद्धार्थ चतुर्वेदी याच्यासोबत दिसली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharvari wagh reacts on reports of dating vicky kaushal brother actor sunny kaushal nrp