राजकारणावर आधारित शासन हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय., शेखर पाठक प्रस्तुत आणि निर्मित या सिनेमात सिनेसृष्टीतले नामवंत कलाकार मंडळींची फौज पाहायला मिळणार आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकणारा सिद्धार्थ जाधव हा ही या सिनेमाचा एक भाग आहे. राजकारण एक असा खेळ आहे की त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सामान्य माणूस गुरफटला जातो. सामान्य नागरिक तसेच कलाकार , नेते मंडळी यांच्या संरक्षणासाठी कायम तत्पर असलेला पोलिस दल अनेकदा दुर्लक्षित केला जातो. पोलिस ही माणूस आहे, त्यांच्याही स्वतःच्या काही गरजा आहेत. सध्याच्या परिस्थितीचा विचार करता एक लाख नागरिकांच्यापाठी पाचशे पोलिस आहेत,त्यामुळे त्यांना अतिरिक्त काम करावे लागते. गणेशेत्सोव, नवरात्र तसेच अनेक सणांमुळे , विविध ठिकाणी निघणाऱ्या मिरवणुका, व्हीआयपी पोलिस बंदोबस्त अशा विविध कारणांमुळे पोलिसांच्या उरल्या सुरल्या रजाही वाया जाते. अशा अनेक पोलिसांच्या समस्या या सिनेमातून दाखवण्यात आल्या आहेत. सिद्धार्थने या सिनेमात पोलिस हवालादारची भूमिका केली आहे. सिद्धार्थने आपल्या अभिनयाने ही भूमिकाही तितकीच जिवंत केली आहे. पोलीसही माणूस आहे, हे त्याने या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवून दिलं आहे. गजेंद्र अहिरे यांनी या सिनेमाच दिग्दर्शन केल असून नरेंद्र भिडे यांनी सिनेमाला संगीत दिल आहे.
श्रेया फिल्म्स या बॅनरखाली निर्मिती करण्यात आलेल्या चित्रपटात सिद्धार्थ जाधव याच्यासह भरत जाधव, मकरंद अनासपुरे, जितेंद्र जोशी,मनवा नाईक, अदिती भागवत, वृंदा गजेंद्र, विक्रम गोखले, मोहन जोशी, नागेश भोसले, डॉ श्रीराम लागू, अमेय धारे, किरण करमरकर अशा दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळणार आहे.
सिद्धार्थ सांगतोय पोलिसांच्या व्यथा
राजकारण एक असा खेळ आहे की त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सामान्य माणूस गुरफटला जातो.
Written by चैताली गुरवguravchaitali
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 28-11-2015 at 11:46 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shasan upcoming marathi movie