नवे खमंग, चविष्ट, खुसखुशीत असे पदार्थ खायला कुणाला आवडत नाही. खरतरं वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खाण्यासाठी अन्नावर प्रेम असावे लागते तरच त्या पदार्थांला न्याय मिळतो. बऱ्याच लोकांना खाण्याची आवड नसतानाही दुसऱ्यांना वेगवेगळे पदार्थ बनवून देण्याची आवड असते. पण एखादा पदार्थ चांगला आहे की वाईट याची पारख एक उत्तम खवय्याच करू शकतो. कलर्स मराठी अश्याच खवय्यांसाठी एक रुचकर कार्यक्रम काही महिन्यांपूर्वी घेऊन आला ‘आज काय स्पेशल’. या कार्यक्रमामध्ये प्रशांत दामले महाराष्ट्रातील खवय्यांच प्रतिनिधीत्व करत असून, बरेच सुप्रसिध्द कलाकार यामध्ये येऊन गेले ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे रुचकर पदार्थ करून प्रेक्षकांची मनं जिंकली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाचा : इच्छा हिची पूर्ण करा

मकरसंक्रांतीनिमित्त अभिनेता शशांक केतकर त्याची पत्नी प्रियांकासह कार्यक्रमात उपस्थित होता. शशांक आणि प्रियांकाचे नुकतेच लग्न झाले असून, त्यांची ही पहिलीच मकरसंक्रांत आहे. कार्यक्रमामध्ये दोघांनी प्रशांत दामले यांच्याशी बऱ्याच मनमोकळ्या गप्पाही मारल्या. त्यांची ही धम्माल मस्ती मकर संक्रांत विशेष भागामध्ये १५ आणि १६ जानेवारीला दुपारी १.३० वाजता तुम्हाला पाहायला मिळेल.

या विशेष भागामध्ये शशांक आणि प्रियांकाने चविष्ठ, रुचकर असे पदार्थ देखील बनवले. शशांकने भोगीची भाजी तर प्रियांकाने तिळगुळाचे लाडू बनवले. पदार्थ बनवताना प्रशांत दामललेंनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देखील त्यांनी दिली. शशांकला स्वयंपाकाची खूप आवड आहे. त्याने बनवलेले मोमोज आणि चायनीज प्रियांकाला खूप आवडते तर प्रियांकाला केक बनवायला खूप आवडतो. याचबरोबर शशांक प्रियांकाचे कौतुक करतानाही दिसला. त्याला प्रियांकाची हास्य खूप आवडते असं तो म्हणाला. याचबरोबर दोघांनी एकमेकांबद्दलच्या बऱ्याच गोष्टी देखील सांगितल्या.

वाचा : शत्रुघ्न सिन्हा-त्रिशाला दत्तची ग्रेट भेट

प्रियांकाला खाण्याची आवड असल्यामुळे ती जंक फूड खूप खाते. त्यामुळे तिने फिटनेसकडे लक्ष द्यायला पाहिजे, असे शशांक म्हणाला. शशांकने भरपूर काम करावं म्हणजे तिलादेखील त्याच्यासोबत खूप फिरता येईल, अशी प्रियांकाने इच्छा व्यक्त केली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shashank ketkar and his wife priyanka in aaj kay vishesh makar sankrant special episode