‘होणार सून मी या घरची..’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेला ‘श्री’ म्हणजेच शशांक केतकर याने स्वत:चे एक मजेशीर छायाचित्र ट्विटरवर शेअर केले आहे. सुरूवातीला अनेकांना शशांकचे हे रूप पाहून धक्का बसला. मात्र, छायाचित्राबरोबरचा संदेश पाहून या सगळ्याचा उलगडा झाला. मला माहिती आहे की, हे विचित्र आहे. पण, मेकअप रूममध्ये तुमच्या हाती अशाप्रकारचा केसांचा विग लागल्यानंतर असे घडते, असे शशांकने त्याच्या ट्विटरवर म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी शशांकने ट्विटरवर प्रसिद्ध केलेल्या त्याच्या बालपणीच्या छायाचित्रानेही अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. सध्या रंगभूमीवर शशांकचे ‘गोष्ट तशी गमतीची’ हे नाटक बरेच गाजत आहे. ‘वन वे तिकीट’ या चित्रपटातून तुम्हाला लवकरच त्याला रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे.

Story img Loader