मराठमोळा अभिनेता शशांक केतकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवरही तो बरेचदा आपलं मत व्यक्त करताना दिसतो. याशिवाय त्याचा इन्स्टाग्रामवरही मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे अनेकदा त्याच्या सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होताना दिसतात. आताही त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात शशांकनं पत्नी प्रियांका ढवळेबाबत एक मोठा खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलिकडेच शशांकनं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात त्यानं पत्नी प्रियांकानं लग्नाआधी त्याच्यासमोर ठेवलेल्या एका खास अटीबद्दल सांगितलं आहे. शशांक केतकरला काही दिवसांपूर्वीच सुलेखा तळवलकर यांनी चॅलेंज दिलं होतं. त्याचा एक व्हिडीओ शशांकनं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, ‘खरं खरं सांगणं इतकं कठीण असतं का?’

आणखी वाचा- घटस्फोटाच्या ८ महिन्यांनंतर आमिर खाननं सोडलं मौन, सांगितलं १५ वर्षांचा संसार मोडण्याचं कारण

शशांकच्या आयुष्यातील खरी गोष्ट ही आहे की शशांकला जेवण बनवायला खूप आवडतं. शूटिंगच्या सेटवर घरातून डबा आणतो तो डबाही त्याने स्वत: बनवलेला असतो. शशांक या चॅलेंज ट्रेंडमध्ये असं सांगितलं आहे की जेवण बनवण्याचा त्याला कधीच कंटाळा येत नाही. शूटिंग नसतं किंवा एक मालिका संपून दुसरे काम हातात नाही तेव्हा त्याला रिकामा वेळ असतो. तेव्हाही तो वेगवेगळे पदार्थ बनवण्याचाच उदय़ोग करत असतो. या पाककलेतून शशांकने आईच्या गावात हे हॉटेल सुरू केले. शिवाय त्यानं त्याचं यूटय़ूब चॅनेल सुरू केलं आहे. त्यात तो वेगवेगळे पदार्थ बनवताना दिसतो. शशांक जेव्हा सेटवर सांगतो की ते पदार्थ त्यानेच बनवले आहेत, तेव्हा अनेकांना ते खोटं वाटतं पण खरंच शशांक त्याचा डबा बनवून आणतो.

आणखी वाचा- “विवेक अग्निहोत्रीला याचे परिणाम भोगावे लागतील…”, ‘द काश्मीर फाइल्स’वर मनोज मुंतशिर यांचं ट्वीट चर्चेत

या व्हिडीओमध्ये शशांकनं सांगितलं की, जेव्हा माझ्या बायकोला प्रियांकाला त्याच्या पाककलेबददल सांगितले तेव्हा, ती म्हणाली होती की, मला जेव्हा कंटाळा येईल तेव्हा तू स्वयंपाक करणार असशील तरच मी तुझ्याशी लग्न करेन आणि मी लगेच होकार दिला होता. त्यामुळे जेव्हा प्रियांकाला स्वयंपाक करायचा कंटाळा येतो किंवा ती दमून येते तेव्हा स्वयंपाकघराचा ताबा मीच घेतो. शशांक सध्या मुरांबा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shashank ketkar wife priyanka dhawale married to him on one special condition know what mrj