प्रदर्शनाला जवळपास २ महिने उलटून गेलेले असतानाही ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत आहे. काहींना या चित्रपटाला काल्पनिक म्हटलं तर काहींना एक विशिष्ट विचारधारा लोकांमध्ये रुजवण्याचं काम हा चित्रपट करतोय असा आरोप या चित्रपटावर केला. त्यानंतर आता काँग्रेस नेता शशी थरूर आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या याच चित्रपटाच्या मुद्द्यावरून ट्विटर वॉर सुरू झालं. पण या वादात विवेक अग्निहोत्री यांनी शशी थरूर यांच्या दिवंगत पत्नीचं नाव घेतल्यानं शशी थरूर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय घडंल?
सिंगापूर फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावर बंदी घालण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आणि त्यानंतर हा वाद सुरू झाला. बंदी घालताना, ‘मुस्लिमांची एकच बाजू मांडून चित्रपट लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला’ असं कारण देण्यात आलं. ज्याचं एक आर्टिकल शेअर करत शशी थरूर यांनी एक ट्वीट केलं होतं. त्यांनी लिहिलं, ‘भारतात सत्तेत असणाऱ्या पक्षानं प्रमोट केलेला चित्रपट ‘द कश्मीर फाइल्स’वर सिंगपूर फेस्टिव्हलमध्ये बंदी घालण्यात आली.’ आपल्या ट्वीटमधून त्यांनी भाजपावर निशाणा साधला होता.

आणखी वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहणार का अक्षय कुमारचा ‘पृथ्वीराज’? अभिनेत्यानं दिलं उत्तर

शशी थरूर यांच्या या ट्वीटवर चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी देखील एक ट्वीट करत उत्तर दिलं. त्यांनी लिहिलं, ‘सिंगापूर जगातील सर्वात प्रतिगामी सेन्सॉर आहे. त्यांनी तर ‘द लास्ट टेम्पटेशन ऑफ जिजस ख्रीस्ट’वरही बंदी घातली होती (तुमच्या मॅडमना विचारा) एवढंच नाही तर रोमँटिक चित्रपट ‘द लीला हॉटेल फाइल्स’वरही बंदी घातली जाईल. त्यामुळे कृपया काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराची खिल्ली उडवणं थांबवा.’

दिवंगत सुनंदा थरूर यांच्याबद्दल काय म्हणाले विवेक अग्निहोत्री?
विवेक अग्निहोत्री यांनी आणखी एक ट्वीट केलं होतं त्यात त्यांनी शशी थरूर यांच्या दिवंगत पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या नावाचाही उल्लेख केला होता.

त्यांनी लिहिलं, ‘तुमची पत्नी दिवंगत सुनंदा पुष्कर या कश्मिरी हिंदू होत्या? जर हा स्क्रीनशॉट खरा असेल तर त्यांचा सन्मानार्थ तुम्ही हे ट्वीट डिलिट करायला हवं.’ या ट्वीटमध्ये त्यांनी सुनंद पुष्कर यांच्या ट्वीटचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ज्यात सुनंदा पुष्कर यांनी स्वतः काश्मिरी हिंदू असल्याचा उल्लेख केला आहे.

विवेक अग्निहोत्री यांच्या या टवीटनंतर शशी थरूर यांनी नाराजी व्यक्त करत एक स्टेटमेंट जारी केलं आहे. त्यात ते म्हणाले, “मी हे स्पष्ट करतो की, मी चित्रपटावर कोणतीही कमेंट केलेली नाही. तसेच मी चित्रपटाची खिल्ली उडवलेली नाही. त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल मला माहिती आहे आणि त्या विरोधात अनेकदा मी आवाज देखील उठवला आहे. पण आता माझी पत्नी सुनंदा पुष्करचं नाव या वादात ओढणं हे फारच चुकीचं आणि लज्जास्पद आहे. हे लोक तिच्या नावाचा वापर त्यावेळी करत आहेत. जेव्हा ती स्वतःची बाजू मांडण्यासाठी या जगात नाही आहे. तिच्या विचारांबद्दल इतर कोणापेक्षाही मला जास्त माहिती आहे. तिला नेहमीच एकात्मतेत विश्वास होता.”

दरम्यान विवेक अग्निहोत्रींच्या चित्रपटाबद्दल बोलायचं तर या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. काश्मिरी पंडितांची हत्या आणि त्यांचं स्थलांतर यावर या चित्रपटाची कथा आधारित असून विवेक अग्निहोत्रींनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shashi tharoor angry reaction on vivek agnihotri use sunanda pushkar name in tweet mrj