बॉलीवूड अभिनेता आणि भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा यांना नियमित तपासणीसाठी अंधेरीच्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शत्रूघ्न सिन्हा यांच्यावर गेल्यावर्षी ह्दयविकाराशी संबंधित बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
या शस्त्रक्रियेनंतरच्या नियमित तपासणीसाठी शत्रुघ्न सिन्हा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गेल्यावर्षी जुलै महिन्यात घरात काम करत असताना, अचानक शत्रूघ्न सिन्हा यांच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर त्यांना लगेचच कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी चाचण्यांमध्ये त्यांच्या ह्दयवाहिन्यांत अडथळे दिसून आल्यानंतर डॉक्टरांनी लगेचच त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया केली होती. शत्रूघ्न सिन्हा यांनी गेल्याच आठवडयात बिहारमधील पाटणासाहिब मधून लोकसभेची निवडणूक जिंकली आहे.

Story img Loader