बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. वेगवेगळ्या विषयांवर ते नेहमीच आपलं मत मांडताना दिसतात. आता शत्रुघ्न यांनी प्रेट्रोलच्या सतत वाढत्या किंमतीवर विनोद केला आहे. त्यांनी पेट्रोलची तुलना बिअरशी केली आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी शत्रुघ्न यांना ट्रोल केले आहे.

शत्रुघ्न यांनी रविवारी एक ट्वीट करत पेट्रोलच्या वाढत्या किंमतीवर विनोद केला आहे. त्यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. यात बियरची बॉटलं दिसत आहे. त्याच्या बाजुला लिहिले आहे की “अनेक दशकांनानंतर बियर ही पेट्रोलपेक्षा स्वस्त झाली आहे. आता नवीन घोषणा असेल फक्त पित रहा आणि गाडी चालवू नका.” शत्रुघ्न यांचे हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

आणखी वाचा : “एक आई आपल्या मुलाला…”, मलायकासोबतचा रोमँटिक फोटो शेअर केल्यामुळे अर्जुन झाला ट्रोल

शत्रुघ्न यांचे हे ट्वीट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांना ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, “चरस आणि अफीम तर अजून स्वस्त आहेत, यामुळेच बॉलिवूड अभिनेता आणि अभिनेत्री तेच घेतात.” दुसरा नेटकरी म्हणाला, “सर बिअर पिल्यानंतर गाडीची गरज नाही, आपली ११ नंबरची बस आहे.” तिसरा नेटकरी म्हणाला, “बिअर प्या आणि गाडी चालवू नका,” अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी शत्रुघ्न यांना ट्रोल केले आहे.

आणखी वाचा : “हिंदू धर्माच्या सणावेळीच ज्ञान का देता….” ; ‘त्या’ पोस्टमुळे रितेश देशमुख झाला ट्रोल

आणखी वाचा : जात लपवण्यासाठीच वडिलांनी स्वीकारलं ‘बच्चन’आडनाव, अमिताभ यांचा खुलासा

विशेष म्हणजे पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. ज्यासाठी विरोधी पक्ष हे केंद्र सरकारवर निशाना साधत आहेत आणि आता शत्रुघ्न सिन्हा यांनी अप्रत्यक्षपणे आपला मुद्दा सगळ्यांसमोर मांडला आहे. तर, शत्रुघ्न सिन्हा यांच्या ट्वीटवर रिप्लाय देत नेटकऱ्यांनी त्यांना बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या ड्रग्स प्रकरणाची आठवण करून दिली.

Story img Loader