२०० कोटी मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी सुकेश चंद्रशेखर तिहार तुरुंगात आहे. या प्रकरणात गेल्या काही महिन्यांपासून अनेक खुलासे होत आहेत. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींशी सुकेशचे प्रेमसंबंध असल्याचं उघड झालं होतं. त्याने महागडे गिफ्ट देऊन तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससह नोरा फतेहीचा समावेश असल्याची चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या खंडणी प्रकरणात जॅकलिनचाही सहभाग आहे का? याचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी काही दिवसांपूर्वी जॅकलिनला समन्स बजावला होता. तसेच तिला सुनावणीसाठी न्यायालयातही हजर राहावं लागलं होतं. यावेळी तिने सुकेश चंद्रशेखर विरोधात जबाब दिला होता. या संपूर्ण घडामोडीनंतर आरोपी सुकेशचं एक नवीन विधान समोर आलं आहे.

हेही वाचा- सुकेश चंद्रशेखरकडून जॅकलिन फर्नांडिसला ‘व्हॅलेंटाइन डे’च्या शुभेच्छा, म्हणाला “तुम्ही ज्याच्यावर…”

आरोपी सुकेश चंद्रशेखर यांनी शुक्रवारी सांगितले की, जॅकलिन फर्नांडिजचा २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात सहभाग नव्हता. तिला काळजी करण्याची काहीही गरज नाही. कारण तिचं रक्षण करण्यासाठी मी इथे आहे, असं विधान सुकेश चंद्रशेखर याने केलं आहे. आरोपी सुकेश याला नुकतंच दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी त्यानं हे विधान केलं आहे. याबाबतचं वृत्त ‘इंडिया टुडे’नं दिलं आहे.