‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. तिच्या सौंदर्याचे तर लाखो दिवाने आहेत. गेल्या बऱ्याच काळापासून शेफाली तिच्या कामापासून दूर आहे. तिने बऱ्याच म्युझिक व्हिडीओमध्ये काम केलं. त्याचबरोबरीने हिंदी ‘बिग बॉस’मध्ये सहभाग घेतल्यानंतर ती पुन्हा एकदा चर्चेत आली होती. खरं तर शेफालीचं खाजगी आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं आहे. तिचं पहिलं लग्न मोडल्यानंतर शेफालीने अभिनेता पराग त्यागीशी लग्न केलं. आता या दोघांचा रोमँटिक व्हिडीओ शेफालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.
शेफालीने पती परागबरोबर स्विमिंग पूलमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे. तर पराग शर्टलेस लूकमध्ये दिसतोय. या दोघांचा स्विमिंग पूलमधील रोमँटिक अंदाज पाहून नेटकऱ्यांनीही त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केलं. तर काहींनी लाज वाटत नाही का? अशा कमेंट्स केल्या. तसेच बेस्ट कपल म्हणूनही काहींनी या दोघांच्या व्हिडीओला पसंती दर्शवली.
शेफालीने स्वतःच हा संपूर्ण व्हिडीओ शूट केला आहे. यामध्ये पराग शेफालीला मिठी मारतो. तसेच तिच्या गालावर चुंबन देखील घेतो. त्यांचा हा व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. ‘कांटा लगा’ गाण्यानंतर रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आलेली ही अभिनेत्री सध्या मात्र चंदेरी दुनियेपासून दूर आहे.
आणखी वाचा – VIDEO : बोल्ड ड्रेसमुळे रुबिनाची फजिती, घडलं असं की फोटोसाठी पोझ देणंही झालं कठीण
शेफालीने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं की, “वयाच्या १५ वर्षांपासून अधिक ताण आणि चिंतेमुळे माझ्या आरोग्यावर परिणाम होत होता. पण त्यानंतर हळूहळू मेडिटेशन, व्यायाम करत मी स्वतःला यामधून बाहेर काढलं.” तिच्या आरोग्यविषयक समस्यांमुळेही शेफालीने अधिक काम करणं बहुदा टाळलं असावं.