आजकाल चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये किंसिग सीन्स, इंटिमेट सीन्स हे बऱ्याचदा पाहायला मिळतात. पण एका अभिनेत्रीला अभिनेत्यासोबत असे सीन शूट करणे सोपे असतात. जेव्हा एखाद्या अभिनेत्रीला दुसऱ्या अभिनेत्रीसोबत असे सीन द्यावे लागतात तेव्हा ते फार कठीण होऊन जाते. अशाच एका सीन विषयी अभिनेत्रीने शेफाली शाहने खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही दिवसांपूर्वीच ‘ह्युमन’ ही वेब सीरिज डिस्नेप्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाली आहे. या सीरिजमध्ये किर्ती कुल्हारी आणि शेफाली शाह या मुख्य भूमिकेत आहेत. तसेच त्यांनी सीरिजमध्ये एक किसिंग सीन दिला आहे. या सीनविषयी शेफालीने ‘पिंकव्हिला’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये वक्तव्य केले आहे.

‘मी या आधी कधीही ऑनस्क्रीन किस केले नव्हते. त्यामुळे मी तिला किस करताना व्हर्जिनिटी गमावली होती. हा सीन शूट करणे माझ्यासाठी कठीण नव्हते कारण किर्ती एक स्त्री आहे. सीरिजमध्ये सायरा आणि गौरी प्रेमात असल्याचे दाखवण्यात आले होते. हे सर्व शूट करणे माझ्यासाठी कठीण नव्हते. मी समलैंगिक नाही पण याचा अर्थ असा नाही की मी त्यांचा आदर करत नाही. त्यामुळे त्या क्षणी या दोन महिलांना वाटणारी ती खरी भावना होती’ असे शेफाली म्हणाली.

शेफालीची ‘ह्युमन’ ही सीरिज प्रचंड चर्चेत होती. या सीरिजनंतर ती ‘जलसा’, ‘डॉक्टर जी’ आणि ‘डार्लिंग’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. चाहत्यांमध्ये तिच्या या चित्रपटाविषयी उत्सुकता पाहायला मिळते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shefali shah talks about kissing kirti kulhari in humans said i lost my virginity to her avb