अभिनेत्री शहनाझ गिलला पंजाबची कतरीना कैफ म्हणून ओळखलं जातं. ‘बिग बॉस’मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली शहनाझ गिल सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. बिग बॉसमध्ये असताना आणि त्यानंतर शहनाझचं खासगी आयुष्य आणि सिद्धार्थ शुक्लाशी असलेली तिची मैत्री बरीच गाजली होती. शहनाझ लवकरच सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण यासोबतच पुन्हा एकदा ती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. शहनाझ गिल पुन्हा प्रेमात असल्याचं बोललं जात असून तिचं नाव एका अभिनेत्याशी जोडलं जात आहे.

शहनाझ गिल सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. याच चित्रपटातून प्रसिद्ध डान्सर राघव जुयालदेखील बॉलिवूडमध्ये पाऊल टाकणार आहे. दोघंही सलमानच्या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग आहेत. पण आता काही मीडिया रिपोर्टनुसार शहनाझ आणि राघव यांच्यात मैत्री पलिकडे काही असल्याचं बोललं जात आहे. दोघांमध्ये जवळीक वाढली असून अनेकादा त्यांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र पाहिलं गेलंय.
आणखी वाचा- अनुराग कश्यपने शेअर केला पूर्वश्रमीच्या पत्नींचा फोटो, म्हणाला “दोघीही माझ्या…”

dhananjay Munde and karuna munde son
धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्या मुलाच्या सोशल मीडिया पोस्टमुळे खळबळ; म्हणाला, “माझे बाबा…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Shashank Ketkar
“इतकं करूनही शेवटी…”, अभिनेता शशांक केतकरने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मागच्या १४ वर्षांत…”
shah rukh khan
शाहरुख खानने आर्यन व सुहानासाठी चाहत्यांना केली ‘ही’ विनंती; म्हणाला, “त्यांना ५० टक्के प्रेम…”
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
shweta kharat
“प्रत्येक माणसाबद्दल…”, ‘पारू’ फेम श्वेता खरातने सांगितला हर्षदा खानविलकर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव; म्हणाली…
Ramesh Deo
मुंबईतील ‘या’ रस्त्याला दिले दिवंगत अभिनेते रमेश देव यांचे नाव; अजिंक्य देव भावना व्यक्त करत म्हणाले, “त्यांनाही निश्चितच आनंद…”
Namdeo Shastri On Dhananjay Munde
Namdeo Shastri : “भगवान गड धनंजय मुंडेंच्या भक्कमपणे पाठिशी”, नामदेव शास्त्री महाराज यांनी मांडली भूमिका

शहनाझ गिल आणि राघव जुयाल यांना बरेचदा एकत्र स्पॉट केलं गेलं आहे. काही दिवसांपूर्वीच दोघंही एकत्र हृषिकेश ट्रीपसाठी गेले होते. या दोघांच्या अफेअरची सोशल मीडियावर चर्चा असली तरीही या दोघांनी अद्याप या नात्यावर भाष्य केलेलं नाही. दोघंही एकमेकांना पसंत करतात मात्र अफेअरच्या चर्चांवर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा त्यांच्या नात्याची कबुली दिलेली नाही.

आणखी वाचा-शहनाझ गिलचं सलमान खानशी बिनसलं? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

दरम्यान शहनाझ गिल याआधी अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबत रिलेशनशिपमध्ये होती. ‘बिग बॉस’ शोमध्येच या दोघांमध्ये जवळीक वाढली होती. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतरही दोघांनी काही अल्बम साँगमध्ये एकत्र काम केलं होतं. या दोघांच्या जोडीला चाहत्यांचीही चांगलीच पसंती मिळाली होती. पण सिद्धार्थ शुक्लाच्या अकाली निधनाने शहनाझसह चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाझ खूप एकटी पडली होती. मात्र काही महिन्यांनंतर तिने स्वतःला सावरलं आणि आता ती आनंदी आयुष्य जगताना दिसतेय.

Story img Loader