अभिनेत्री शहनाज गिल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिची सोशल मीडियावरील फॅन फॉलोइंग मोठी आहे. शहनाज तिचे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करता चाहत्यांच्या संपर्कात असते. तिच्या फोटो आणि व्हिडीओवर चाहते लाइक्स व कॉमेंट्सचा वर्षाव करत असतात. दरम्यान, बुधवारी शहनाजने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये, शहनाज आणि तिची टीम मराठी चित्रपट ‘सैराट’मधील ‘झिंगाट’ गाण्यावर डान्स करताना दिसतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहनाजने पेस्टल ब्लू रंगाचा ड्रेस परिधान केला असून ती उत्साहाने डान्स करताना दिसतेय. तर, तिची टीमही तिच्याबरोबर डान्स स्टेप्स जुळवण्याचा प्रयत्न करत आहे.

दरम्यान, शहनाज सध्या एका नव्या टॉक शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. देसी वाइब्स असं तिच्या टॉक शोचं नाव आहे. नुकसात या शोचा पहिला भाग प्रसारित झाला. पहिल्या भागात अभिनेता राजकुमार राव त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसला होता.

शहनाजने २०२१ मध्ये दिलजीत दोसांझसह ‘होंसला रख’ या चित्रपटातून पंजाबीमध्ये पदार्पण केलं होतं. तसंच ती बॉलिवूडमध्ये सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ चित्रपटातून पदार्पण करणार आहे. या चित्रपटात पूजा हेगडेची महत्त्वाची भमिका असणार आहे. शहनाज गेल्या काही महिन्यांपासून या चित्रपटाचं शुटिंगकरत आहे. फरहाद सामजी दिग्दर्शित हा चित्रपट एप्रिल २०२३ मध्ये रिलीज होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shehnaaz gill dance performance on zingaat song from sairat movie video viral hrc